सोन्याळ | गावभागात विज वितरण कंपनीचा विजेचा मध्यवर्ती असणारा डिपी धोकादायक | www.sankettimes.com

0

सोन्याळ,वार्ताहर : सोन्याळ ता.जत येथे गावभागात विज वितरण कंपनीचा विजेचा डिपी मध्यवर्ती असणारा धोकादायक बनत आहे.त्यामुळे तो हलविण्यात यावा अशी मागणी होत आहे. गावातील मांग गल्लीतील दाट लोकवस्तीत हा डिपी आहे.त्यांच्या फिजाची पेटी सताड उघडी असते.त्यामुळे विजेचा शॉक लागण्याची शक्यता आहे.डिपीला जोडलेल्या विज वाहक तारा अनेकवेळा एकमेकाला घरसण होऊन ठिंणग्या पडतात.त्यामुळे आग लागू शकते.लगत लोकवस्ती असल्याने कायम धोका संभवतो.त्यामुळे तातडीने हा डिपी हलवावा अशी मागणी होत आहे.

सोन्याळ ता.जत येथे गावभागात धोकादायक ठरत असलेला डिपी.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.