कोंतेबोबलाद मधील प्रकार
जत,प्रतिनिधी : कोंतेबोबलाद ता.जत येथील मल्लिकार्जून शंकरप्पा गडदे (वय-68) व त्यांच्या पत्नीस शेतातील रस्त्याच्या वादातून गंभीर मारहाण करत अंगावर टँक्टर घालून जिवेमारण्याचा प्रयत्न केला.घटना शनिवारी 4 च्या दरम्यान घडली.यात मल्लिकार्जून गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत उमदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी 3 संशयिताना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, कोंतेबोबलाद येथील मल्लिकार्जून गडदे व भावाचा जमिनीच्या रस्त्याचा जूना वाद होता.त्यातून शनिवारी 4 च्या सुमारास मल्लिकार्जून व त्यांची पत्नी हे शेतीमध्ये काम करत असताना शंकरप्पा गडदे यांच्याबरोबर वाटे कारणावरून पुन्हा वाद झाला.त्या वादातून शंकऱ्याप्पा यांने मल्लिकार्जून व पत्नीस शिवागाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर अनिल भिमू गडदे यांने मल्लिकार्जून यांना टँक्टर खाली चिरडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यात मल्लिकार्जून हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर विजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शंकरप्पा आमसिध्द गडदे,अनिल भिमू गडदे,
आमसिध्द शंकरप्पा गडदे, सरस्वती आमसिध्द गडदे, रूपा,(पुर्ण नाव माहिती नाही)सर्व रा.कोंतेबोबलाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे करत आहेत.





