संख | विषारी औषध पिऊन शेतकऱ्यांची आत्महत्या आकळवाडीतील घटना | www.sankettimes.com

0

 

संख,वार्ताहर :

    आकळवाडी(ता.जत)येथील शेतकरी संगप्पा पराप्पा मनकंलगी (वय-45) या शेतकऱ्यांने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान कर्जाच्या दबावातून संगाप्पा यांनी विषारी औषध पिल्याची घटनास्थळी चर्चा होती.

Rate Card

    याबाबत अधिक माहीती अशी की,13 एप्रिल शुक्रवारी संकाळी अकराच्या दरम्यान घराजवळील शेतात मयत संगप्पा याने विष प्राशन केले होते.त्यांची माहीती कुटुंबियाना मिळाताच त्यांना तातडीने विजापुर येथील बीएलडीए दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारास प्रतिसाद देत नसल्याने सायंकाळी डॉक्टरांनी संगाप्पास पुढे हलविण्याचा सल्ला दिला.संगाप्पास पुढील उपचारासाठी नेहत असताना वाटेतच त्यांचा मुत्यू झाला.दरम्यान संगप्पा पराप्पा मनकंलगी हे आपल्या स्वं:ताच्या नावे असलेल्या शेती सुधारणेसाठी एका राष्ट्रीय कृत्त बँकेतून काही वर्षापुर्वी कर्ज घेतले होते. मात्र शेतीतील पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने कर्जफेड झाली नव्हती.बँकेने थकीत कर्ज वसूलीसाठी संबधित बँकेने न्यायालयामार्फत संगाप्पास नोटीस पाठविले होते.त्यामुळे संगाप्पा मानसिक दबावात होते.त्यातून संगाप्पाने विषारी औषधे पिऊन जीवन संपवल्याचे चर्चा घटनास्थंळी सुरु होती.मात्र अज्ञात कारणामुळे विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा गुन्हा उमदी पोलिसांत दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद चुलते शरणप्पा आप्पासाब मनकंलगी यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.