जत | भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 127 व्या जंयती निमित्य | www.sankettimes.com

0

Image result for भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर

 भारतीय कायदेतज्ञ राजकारणी स्वातंत्रोत्तर काळातील भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशच्या महू गावामध्ये महार समाजातील रामजी व भिमाई यांच्या पोटी झाला.14 एप्रिल 1891 साली भीमबाळ जन्मास आले.पण या कुटूंबाचे मूळगाव रत्नागिरी जिल्हयातील आंबवडे. या भीमबाळाचे प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या कॅम्पस स्कूलमध्ये झाले. वर्गातील अस्पृश्य मुलगा म्हणून यांना नेहमीच शिक्षणासाठी बाजूला बसवले जाई.1898 साली त्यांचे कुटूंब मुंबईत स्थायिक झाले 1907 साली भीमराव मॅट्रिकपास झाले. त्यानंतर एलफिस्टन महाविद्याल यातून बी.ए.ची पदवी संपादित करणारा अस्पृश्य वर्गातील हा पहिलाच विद्यार्थी होय. याच काळात त्यांचे लग्न दापोलीच्या 9 वर्षीय रमाबाईशी झाले. या मुलाची शिक्षणाची भूक पाहता बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी अमेरिकेतील शिक्षणासाठी प्रतिमहा 25 रू शिष्यवृती देऊ केली.त्यानंतर भीमरावानी न्यूयार्कच्या कोलंबिया युनिवर्सीटीतून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयात पदवी संपादित केली . आणि याच वर्षी त्यांना एक आनंदाची बातमी देखील मिळली, ती म्हणजे त्यांच्या कुटूंबात यशवंत नामक बाळ जन्माला आले. एकीकडे शिक्षणाची भूक भागवत असताना आईचा आधार हरवला. तर 1993 साली वडील रामजीचेआजारपणामुळे मुंबईत निधन झाले . कुंटूबावरती दुखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली नाही.1993 ते 1097 सालापर्यत भीमरावांचा प्रबंध पीएचडी ही पदवी मिळविण्यासाठी कारणीभूत ठरला. या वेळेस भीमराव फक्त 25 वर्षाचे होते.शिक्षणामध्ये पदोन्नती करणाऱ्या भीवरावानी अस्पृश्यविरुद्ध संघर्ष देवू  केला त्या काळात दलित व मागासलेल्या समाजासाठी त्यांच्या मनात तळमळ निर्माण झाली आणि त्यातूनच 1927 साली पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. अस्पृश्यांना हिंदू देवळात प्रवेश मिळावा यासाठी नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह केला याच वेळेस ते राजकारणातही सक्रीय झाले 1920 च्या सुमारास आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले इतकेच नव्हे तर दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी पुणेकरार केला.दलित समाजाच्या उधारासाठी लढत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन 1935 साली झाले पण त्यांनी न खचता आपला लढा असाच चालू ठेवला.13 ऑक्टोबर 1935 रोजीऐवले मुक्कामी आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली .दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या याच व्यक्तीने प्रज्ञा शिल आणि करुणा या त्रिसूत्रीचा अंगिकार करुन बौद्ध धर्माची निवड केली.1956 साली त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी मध्ये लाखो दलिताना बोद्ध धर्माची दीक्षा दिली. अस्पृश्य समाजाला न्याय मिळावा यासाठी त्या समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जात्याचे प्राशन करेल ता गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.असं म्हणणाऱ्या आंबेडकरांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन मुंबईत सिद्धार्थ व औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना केली.या काळात एकीकडे स्वातंच्याचा लढा सुरू होता तर दुसरीकडे भारतीय संविधान लिहिण्याच काम सुरू झालं होतं.भारतीय संविधान लिहिण्याच काम हे आंबेडकरानी केले ही किती अभिमानास्पद बाब आहे .डॉ. आंबेडकरानी 1952 मध्ये कोलंबिया युनिवर्सिटीतून डॉ ऑफ लॉ ही पदवी संपादित केली.तेव्हापासूनच डॉ.आंबेडकरांना संपुर्ण जग ओळखू लागलं बाबासाहेबाचे विचार लोकांपर्यत पोहचविण्यासाठी वृत्तपत्राबरोबरच शाहिरांच्या गाण्याचाही उपयोग झाला त्यावेळी आंबेडकर म्हणायचे माझ्या 10 भाषणासमोर शाहिराच एक गाणं आहे . अशा शब्दात ते शाहिरांचा गौरव करत.  त्याचबरोबर त्यांनी व्हायोलिन ही वाजवले आहे. माझी आत्मकथा ,हिंदू धर्माचे तत्वज्ञान आणि दलितांचे शिक्षण यासारखी पुस्तके त्यांनी लिहिली. डॉ बाबासाहेब या निळ्या वादळाने माणसाला जगायला शिकावले . या महापुरुषाचे निर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले तेव्हा अवघा बहुजन समाज आक्रोश करून रडू लागला. अवघ्या जगात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखा अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी पुन्हा होणार नाही म्हणूनच त्यांच्या कार्याला व कतृत्वाला मानाचा मूजरा.                                                                                                                                                                                           श्री.इंद्रजीत लोंढे,हिंगणगांव ता.कवठेमहांकाळ

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.