खेड्यातील मुलगी जागतिक स्पर्धेत चमकली
गुगवाड, वार्ताहर : थायलंड येथे झालेल्या 8 वर्षाखालील बुध्दींबळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंदूर ता.जत येथील कु.श्रेया गुरप्पा हिप्परगी ही मुलगी भारताची शान बनली आहे.या स्पर्धेत जगभरातील 26 देशातील 40 खेळाडू भाग घेतला होता.श्रेया हिची तिसऱ्या स्थानी विजयी झाली आहे.भारताकडून वेगवेगळ्या राज्यातून 7 मुलींनी भाग घेतला होता. त्यांच्यातून श्रेयाचा पहिला क्रमांक आहे. चेसचे विविध स्पर्धेत यावेळी 4 पदके पटकावले आहे.आगामी दिल्ली येथे आयोजित कॉमनवेल्थ आणि स्पेन मध्ये होणाऱ्या वर्ल्ड युथ स्पर्धेसाठी श्रेयाची निवड झाली आहे.एबीपी माझा चॅनेल टीम सोलापूर यांनीही धाऊन आले.त्यांनी श्रेयाचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
वडील गुरप्पा हिप्परगी हे संख येथे शिक्षक आहेत. दोन्ही मुली जिल्हा परिषद शाळेत शिकत आहेत.दोन्ही मुलींना चेस आवडतो, वडिलांच्या मदतीने मुलींनी यशाची शिखरे संपादन केली आहे. अनेक स्पर्धेत पदके पटकावले आहेत.
खेड्यात कोच मिळत नसतानाही श्रेयाने वडील मदतीने रोज 4,5 तास स्वतः व ऑनलाइनचा मदतीने चेसची सराव करून यश मिळविले आहे.
श्रेयाचा सोलापूर रेल्वे स्टेशन येते आगमन होताच सिंदूर गावचे सरपंच गंगप्पा हारुगेरी यांनी सर्व स्पर्धक मुलींचे स्वागत केले. श्री.हिप्परगी,श्री. बिरादार सर,राजेंद्र जिगजेनी,
सिंदूरचे कल्लाप्पा अडळट्टी आदींनी श्रेयाचा जंगी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सिंदूर (ता.जत) येथील श्रेय्या हिप्परगी हिंचा सोलापुर रेल्वे स्टेशनवर सत्कार करण्यात आला.