जत | पंपहाऊस, कालव्याची कामे गतीने पुर्ण करा : आ.जगताप | www.sankettimes.com

0
8

म्हैसाळ योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी 

जत,प्रतिनिधी : जत पश्चिम भागातील म्हैशाळ योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आ.विलासराव जगताप यांनी अधिकाऱ्यांसमवेत कालव्याच्या कामाच्या प्रगतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या तक्रारी गाऱ्हाणी ऐकून तातडीने सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या तसेेेच 

तसेच कामे गतीने करा,निधी कमी पडणार नसल्याचेही यावेळी ठेकेदार सुचना दिल्या.

आमदार जगतापांनी धावडवाडी, डोर्ली,अंकले पंपहाऊस,बाज,बेंळूखी, डफळापूर, मिरवाड,खालाटी पंपहाऊसची पाहणी केली.

म्हैसाळ योजनेचा पंतप्रधान सिंचाई योजनेत समावेश झाल्याने आलेला निधीतून कामे डिंसेबर 2018 पर्यत पुर्ण करावयाची आहेत.पश्चिम भागातील कामे मार्च अखेरपर्यत संपवायची आहेत.त्यामुळे गतीने कामे सुरू आहेत. त्यात काही शेतकऱ्यांनी अडवाआडवी केल्याने काही ठिकाणची कामे रखडली आहेत.त्यासंदर्भात संबधित शेतकऱ्यांच्या अडचणी आ.जगताप यांनी जाणून घेऊन उपाययोजना करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.या दौऱ्यात अजिक्यतांराचे प्रभाकर जाधव, सुनिल पवार,म्हैशाळ योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी सी.एस.मिरजकर,सा.अभियंता एम.बी.कर्नाळे,कनिष्ठ अभिंयते एम.एस.राठोड,जी.बी.मुल्ला आदी अधिकारी सामील होते.

खलाटी ता.जत येथील पंपहाऊसचे काम संत गतीने सुरू असल्याचे आ.जगताप यांच्या निदर्शनास येताच संबधित ठेकेदारांची चांगलीच कानउघडणी करून गतीने कामे करण्याचे कडक शंब्दात आदेश दिले.

जत : पश्चिम भागातील म्हैशाळ योजनेच्या कामाचा योजनेच्या अधिकाऱ्यांसमवेत आ.जगताप यांनी आढावा घेत पाहणी केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here