डफळापूर | डफळापूर जतेत मटका अड्ड्यावर छापा | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी:जत व डफळापूर येथे बेकायदा सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर जत पोलिसांनी छापा टाकून  मोबाईल, मटक्याचे साहित्य व रोख दहा हजार 500 असा बारा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मटका घेणार्‍या दोघांना अटक केली आहे. 

Rate Card

 जिल्हा पोलिस प्रमुखाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. मटका घेत असताना विनोद दत्ता जाधव व अजय शामराव मोहिते (दोघेही रा. नाटेकर गल्ली) यांना अटक करण्यात आली. याबाबत जत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.पोलिस नाईक राहुल जाधव यांनी फिर्याद दिली. डफळापूर येथील परशुराम आदिनाथ कदम(वय-27,रा.महाजन गल्ली) याला मटका घेताना रंगेहाथ पकडले.त्यांच्याकडे रोख रक्कम, मटक्याचे साहित्य, मोबाईल असा वीस हाजाराचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी कदम याला ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य आरोपी संशियत मटका बुकी सिकंदर जमादार रा.सांगली हा फरार आहे.बुकी जमादापा यांच्या सांगण्यावरून कदम डफळापूर येथे मटका घेत होता.या दोन्ही घटनेची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस माहिती खबऱ्याद्वारे मिळाली होती. पथकाने शनिवारी कदम यांच्या घरी छापा टाकला.त्यावेळी मटका घेताना रंगेहाथ पकडले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे राजू कदम,एस.बी.कुडचे,एम.व्ही.कदम,ए.आर.कोळेकर, आदीच्या पथकाने छापा टाकला. या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.