जत,प्रतिनिधी : जत उत्तर भागात
शनिवार सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसाचा जोरदार तडाखा अंतराळ व बनाळी परीसरातील आंबा बागायती शेतीला बसला.वादळी वाऱ्यांने डाळिंब, आंबा,चिकू बागाचे मोठे नुकसान झाले आहे.
अंतराळ ता.जत येथे श्री. बी. आर. सावंत कुटुंबियांचे बनशंकरी केशर आंबा व नर्सरी फार्म असुन सुमारे दहा एकर आंबा फळबाग आहे. अतिशय प्रतिकुल आणि दुष्काळी परिस्थिती असतानाही खडतर परिश्रमातुन जीवापाड जपलेली फळबागेला वादळाचा तडाखा बसला. शनिवारी झालेल्या भयंकर वादळी वारे आणि पावसामुळे श्री.सावंत यांचे ऐन भरात आलेल्या 1200 आंब्याच्या झाडांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
परिसरातील शेतकर्यांच्या नुकसानीची दखल घेवुन कृषी विभागाने पंचनामा करुन योग्य ती नुकसानभरपाई शेतकर्यांना द्यावी अशी मागणी श्री.सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
बनाळी ता.जत येथील आण्णासाहेब सांवत यांच्या 1200 आब्यांचे परिपक्व आंब्याचे असे झाडाखाली अथंरून झाले आहे.
अटैचमेंट क्षेत्र





