जत | एकतर्पी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर ब्लेडने हल्ला : सैराट मजनूचाही आत्महत्येचा प्रयत्न | www.sankettimes.com

0


Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला होण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर आरोपीकडून ब्लेडने वार करण्यात आले आहेत. जत शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपी तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या हाताचीही नस कापून घेतली.यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात शालेय मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची नेमणूक असतानाही असे प्रकार घडत आहेत.यापुर्वीही संभाजी चौका दरम्यान  बाहेर गावातील एका मुलींला ओमनीतून पळवून नेहण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे शालेय मुलीच्या सुरक्षा पुन्हा धोक्यात आली होती. शाळा सुटल्यानंतर सैराट युवकांचा वावर कायम असतो.कशाही सुसाट दुचाकी पळविणे,मुलीकडे बघून हातवारे करणे अशा अनेक घटना नित्याच्या होत असतात.मात्र तक्रार केल्यानंतर कॉलेज बंद होईल या भितीने मुली तक्रारी करण्याच धजावत नाही.परिणामी एकतर्पी प्रेम करणाऱ्या मंजूना यामुळे बंळ मिळते मग ते कुठल्याही स्थराला जातात.हे या घटनेवरून समोर आले आहे. या प्रकारामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून आरोपी तरुणाची प्रकृतीही गंभीर आहे. दोघांना जतमधील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.