बसर्गी | जनावराच्या गोठ्या आग | www.sankettimes.com

0
29

5 गाई,2 म्हैशाचा भाजून मुत्यू : 5 लाखाचे नुकसान

गुगवाड, वार्ताहर : बसरगी ता.जत येथे छप्परास आग लागून व मोटारसायकलीचा स्फोट होऊन सहा गायींचा होरपळून मृत्यु झाला. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी तीन वाजता घडली. 

बसर्गी गावच्या हद्दीत शेतकरी श्री.निंगाप्पा कुशाबा बामणे व संगाप्पा कुशाबा बामणे यांचे  सर्व्हे नं. 162/3  मधील शेतात जनावरांचा गोठा होता. गुरूवारी दुपारी अचानक गोठ्यांस आग लागली. यावेळी गोठ्यात मोटारसायकल उभी होती. मोटारसायकलीच्या पेट्रोल टाकीचा आगीमुळे स्फोट झाला.त्यामुळे आग आणखीच भडकली. या गोठ्यात जर्सी जातीच्या सहा गायी होत्या. या भीषण आगीत होरपळून त्यांचा मृत्यु झाला.  

बसर्गी येथील संगाप्पा कुशबा बामणे,व निगाप्पा कुशबा बामणे या शेतकऱ्यांच्या जनावराच्या गोठ्यास अचानक आग लागून सुमारे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. आगीत 5 जर्सी गाई,2 म्हैशींना गंभीर भाजल्याने त्यांचा जागीत मुत्यू झाला.घटना गुरूवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली.

अधिक माहिती अशी,निंगाप्पा बामणे,संगाप्पा बामणे या दोन भावांचे शेतात घर आहे. घरालगत दोघाचेही गाईचे गोठे आहेत.गोठ्यास कुड असल्याने अचानक आग लागली. गोठ्यात गाई,म्हैशीचा आरडाओरडा सुरू होता.मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने व जनावराचे बांधलेले दोर मजबूत असल्याने ते तुटू शकले नाहीत. परिणामी आगीत जनावरे गंभीर भाजल्याने जागीच मुत्यूनुखी पडली.त्याचबरोबर गोठ्यात ठेवलेली दुचाकी गाडी,दोन सायकली,कडबाकुट्टी मशीन,ड्रिपचे साहित्य, जळून खाक झाले आहे.गोठ्याला ऊसाच्या पाल्याचे कुड असल्याने आग भडकली. घटनेत निंगाप्पा बामणे यांचे  2लाख 28 हाजाराचे तर संगाप्पा बामणे यांचे 2 लाख 9 हाजाराचे नुकसान झाले आहे.मोठे नुकसान झाल्याने बामणे कुंटुबियांना दानशुरू लोक व संस्थानी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.मंडल अधिकारी अभय शेटे,  तलाठी दादा पाटील,   यांनी नुकसानीचा पंचनामा केला.  सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.पशुवैद्यकीय अधिकारी पांढरे यांनी उत्तरीय तपासणी केली. माजी सरपंच शिवापा तांवशी यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here