ग्राहकांचा मोठा प्रतिसाद:लग्न बसत्यासाठी सर्वदूर प्रसिद्ध
येळवी,वार्ताहर :जतपासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या येळवी येथील विजयकुमार पोरे यांच्या अविनाश वस्त्र निकेतनला ग्राहकांतून मोठी पसंती मिळत आहे. जत तालुक्यातूनच नव्हे तर शेजारील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील ग्राहकही अविनाश वस्त्र निकेतनकडे आकर्षिले गेले आहेत.
खात्रीशीर माल, एकच भाव, विनम्र सेवा, विविध ब्रॅण्डेड कंपनीची दालने व मागील 38 वर्षांपासून जपलेला ग्राहकांच्या विश्वासामुळे अविनाश वस्त्र निकेतन व ग्राहक यांचे अतूट विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. वस्त्र निकेतनच्या दुनियेत येळवीतील अविनाश वस्त्र निकेतन हे खास करून लग्न बसत्यासाठी सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे.
मागील 38 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत रुजू असलेले येळवीतील अविनाश वस्त्र निकेतनने महागाईतही स्वस्ताई जपली आहे. येळवीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच विजयकुमार पोरेमालक यांनी 1980 साली सुरू केलेल्या छोटेखानी कापड दुकानाचे आज वस्त्र निकेतनमध्ये रूपांतर झाले आहे. खुद्द विजयकुमार पोरेमालक व त्यांचे चिरंजीव श्रीमंत अष्टविनायक ग्रुप व आधार फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे समर्थपणे अविनाश वस्त्र निकेतनची धुरा संभाळत आहेत. एकाच छताखाली, एकाच दरात ग्राहकांना सेवा देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिल्याने ग्रामीण भागातही नामांकित रेमंड, सियाराम, डोनियर, रामराज, वुडलँड, ऐनी टाइम, किलर आदी कंपन्यांचे ब्रॅण्डेड कपडे सहज उपलब्ध झाले आहेत.
अविनाश वस्त्रनिकेतनमध्ये खास लग्न बसत्यासाठी स्वतंत्र दालन आहे. खास नवरदेवासाठी शेरवाणी, फोर पीस, इंडो वेस्टर्न, नववधुसाठी रेशमी बनारसी शालू, पैठणी, कांजीपुरम, बंगलोरी साडयासह सुरत साडी आदी साड्या एकाच छताखाली उपलब्ध असल्याने अविनाश वस्त्र निकेतन हे साडयांचे माहेर घर बनले आहे. शर्ट, टी शर्ट, चुडीदार, घागरा, लहान मुलांचे फॅन्सी ड्रेसही माफक दरात अविनाश वस्त्र निकेतनमध्ये उपलब्ध आहेत.
★ ब्रॅण्डेडचेही बनले ब्रॅण्ड
ब्रॅण्डेडच्या नावाखाली दरात ग्राहकांचा खिसा मारला जातो पण अविनाश वस्त्र निकेतन हे ब्रॅण्डेडचेची ब्रॅण्ड बनले आहे. नामांकित कंपन्यांच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दर आकारला जातो पण अविनाश वस्त्र निकेतनमध्ये अव्वाच्या सव्वा दर न आकारता नामांकित कंपन्यांचे ड्रेस व अन्य मटेरियल हे स्वस्त व किफायतशीर दरात ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अविनाश वस्त्र निकेतनने ग्राहकांशी जपलेल्या या नात्यामुळे ग्राहकांच्या नजरेत अविनाश वस्त्र निकेतन हे ब्रॅण्डेडचेही ब्रॅण्ड बनले आहे.
■ परंपरा 38 वर्षांची…
जतसारख्या दुष्काळी भागात येळवीसारख्या ठिकाणी व्यवसाय करणे, नावारूपाला आणणे व सातत्य ठेवणे हे अवघड काम शक्य करून दाखवत मागील 38 वर्षापासून यशाची चढती कमान कायम ठेवण्यात विजयकुमार पोरे यांच्या अविनाश वस्त्र निकेतनने यश मिळवले आहे. स्पर्धेच्या या युगात 38 वर्षांची परंपरा कायम राखल्याचा आनंद होत असून याचे सारे श्रेय ग्राहकांच्या विश्वासाला असल्याची प्रतिकिर्या अविनाश वस्त्र निकेतनचे मालक विजयकुमार पोरे यांनी व्यक्त केली.