जत | जतमधील हल्लाबोल यात्रा ऐतिहासिक ठरेल माजी आ.प्रकाश शेंडगे | www.sankettimes.com

0
1

जतमधील हल्लाबोल यात्रा ऐतिहासिक ठरेल

माजी आ.प्रकाश शेंडगे

: सभा गर्दीचे सर्व उंच्चाक मोडेल

जत,प्रतिनिधी : जत येथे 4 एप्रिलच्या हल्लाबोल यात्रा ऐतिहासिक होणार असून जत तालुक्यातील 30 हाजार शेतकरी या मेळाव्यात सामील होतिल अशी माहिती माजी आ.प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जत येथील हल्लाबोल यात्रा पुर्व तयारी व आढावा बैठकीचा आढावा शेंडगे यांनी घेतला.

बैठकीला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. बसवराज धोंडमणी,रमेश पाटील, सिध्दूआण्णा शिरसाड,लक्ष्मण शिद्दरेडी,भ.वि.जा.जत तालुका अध्यक्ष सचिन मदने, अविनाश वाघमारे बसवराज अलगूर,बिरू माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

शेंडगे पुढे म्हणाले, गेली साडेतीन वर्षे होऊनही सत्ताधारी आमदारांना निवेदन द्यावे लागत आहेत.जेथे विकास कामे सुरू होणे गरजेचे होते.तेथे आमदारांचा कामे आणण्यासाठी संघर्ष करावा लागत  आहे.त्यांना तेथे अपेक्षा भंग झाला असून त्यांनी स्वगृही परतावे असेही शेंडगे यांनी आवाहन केले.

शेंडगे म्हणाले, साडेतीन वर्षात जत तालुक्यात विकास खुंटला आहे. तालुक्याची महत्वाची असणाऱ्या पंचायत समिती भष्ट्राचाराने भ्रष्ट झाली आहे. अधिकाऱ्यांना जेलवारी झाली असून काही नेतेही जेलमध्ये जाणार आहेत. त्यामुळे जनतेचा भ्रमनिराश केलेल्या या सरकार विषय प्रंचड असंतोष जनतेतून व्यक्त होत आहे.

शेंडगे म्हणाले,देश,राज्य,जिल्हा, तालुक्यात सत्ता असतानाही जत तालुक्याचा विकास साधता आला नाही. गेल्या साडेतीन वर्षात म्हैसाळ योजना, बंधारे सह अनेक विकास योजना पुढे सरकल्या नाहीत. जनतेला वेठीस धरणाऱ्या या सरकार विरोधातल्या हल्लाबोल करण्याची संधी यानिमित्ताने जत तालुक्यातील जनेतला मिळाली आहे.तालुक्यातील असंतोष या निमित्ताने समोर येणार असून जतच्या सभेला यामुळे ऐतिहासिक महत्व आले असून गर्दीचे सर्व उंच्चाक हल्लाबोल यात्रा मोडेल असेही शेंडगे म्हणाले.

सरकारने नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी करून जनतेचे हाल केले आहे. राज्यात यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे.त्यामुळे विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्रात प्रंचड प्रतिसाद मिळाला आहे.पश्चिम महाराष्ट्रतही कोल्हापूरात तुफान गर्दी या सरकारला उलथवून टाकण्यासाठी हल्लाबोल करेल एवढे निश्चित.जत तालुक्यातील म्हैसाळ योजना, हमीभाव,जलसंधारणाची कामे,पुर्व भागातील 42 गावाचा रखडलेला पाणी प्रश्न,तालुका विभाजन यावरही या सभेत हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे जतच्या या हल्लाबोल यात्रेत तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर व तमाम जनतेनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन शेंडगे यांनी केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here