जत | जाहीर सभा यशस्वी करून पक्षाची ताकद दाखवून द्या,आ.जयंतराव पाटील | www.sankettimes.com

0
2

जत, प्रतिनिधी :

       जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. दि.4 एप्रिलची जत येथील जाहीर सभा यशस्वी करून पक्षाची ताकद दाखवून द्या,असे आवाहन माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी जत येथील बैठकीत केले. भाजपा सरकारच्या सामान्य माणूस, शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणांच्यामुळे सध्या नरेंद्र मोदीसाहेब सोशल मीडियामध्ये टीकेचे लक्ष्य बनले आहेत,अशी टीकाही त्यांनी केली.

          जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत दि.४ एप्रिल रोजी दुपारी जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती सुरेशराव शिंदे (सरकार), तालुकाध्यक्ष अँड.बसवराज दोडमनी,माजी जि. प.सदस्य अँड.चन्नाप्पा होर्तीकर,रमेश पाटील,माजी सभापती मन्सूर खतीब,डफळापूरचे जे.के.माळी,युवक तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण,महिला तालुकाध्यक्षा मीनाक्षी अक्की प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अनेक नूतन पदाधिकाऱ्यांना आ.पाटील यांच्या हस्ते निवड पत्रे देण्यात आली.

         आ.पाटील म्हणाले,हे सरकार सामान्य माणूस व शेतकरी विरोधी आहे. आपल्या तालुक्यात पूर्वीसारखी परिस्थिती नाही. युवक व जनता शहाणी झाली आहे. त्यांना चांगले-वाईट कळत आहे. तालुक्यात सध्या  चौपदरी रस्त्याच्या कामाशिवाय दुसरे काही काम चालू असल्याचे दिसत नाही. अजितदादा पवार हे स्पष्टवक्ते आहेत. आपल्या सभेचे ऑडिट होणार नाही,याची काळजी घ्या. 

      सुरेशराव शिंदे म्हणाले,या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरली आहे. आम्ही आप-आपल्या भागात फिरून जोरदार तयारी केली आहे. हल्लाबोल सभा जोरात करू. भविष्यात टीम वर्क करण्यावर भर देवू.

        अँड.चन्नाप्पा होर्तीकर,रमेश पाटील,डफळापूरचे जे.के.माळी,युवक तालुकाध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण यांनी हल्लाबोल सभा मोठी करू,असा विश्वास व्यक्त केला.

डॉ.पराग पवार,लक्ष्मण करळे यांनी ही मनोगत व्यक्त केले. काँग्रेसचे सुनील साळे यांनी आम्ही आपल्याबरोबर असल्याची ग्वाही दिली.

        याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, उपसभापती शिवाजीराव शिंदे,उपनगराध्यक्ष आप्पासो पवार,सिद्धआण्णा शिरसाट,शंकरराव गायकवाड, मच्छिन्द्र वाघमोडे,टीमु एडके,स्वप्नील शिंदे,पांडुरंग मळगे,बाजी केंगार,हेमलता निकम,ए.डी.माने,रवी मान्वर,यांच्यासह जत शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी- जत येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेच्या जागेची पाहणी करताना मंत्री आ.जयंतराव पाटील. समवेत सुरेशराव शिंदे,रमेश पाटील, अँड.चन्नाप्पा होर्तीकर,मन्सूर खतीब,बाळासाहेब पाटील, अँड.बसवराज दोडमनी,भरत देशमुख,सौ.मीनाक्षी अक्की व मान्यवर

जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील.समवेत सुरेशराव शिंदे,अँड.चन्नाप्पा होर्तीकर,रमेश पाटील,अँड.बसवराज दोडमनी, मन्सूर खतीब व मान्यवर.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here