जत | मोफत सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणीचे आवाहन | www.sankettimes.com

0
22

जत,प्रतिनिधी : धर्मादाय उप आयुक्त कार्यालय,सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगली विभाग यांच्या विद्यमानाने व सांगली जिल्हा धर्मादाय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्यावतीने मोफत सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा गुड्डापूर येथे आयोजित केला आहे. यात विवाह इंच्छुकांनी 15 मे 2018पुर्वी नाव नोंदणी करावी असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ.रविंद्र आरळी यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील गोर-गरीब,आर्थिक दृष्ट्या दुर्बल,गरजू लोंकाना मदत व्हावी या हेतूने या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांना मनी मंगळसुत्र व यथायोग्य संसारउपयोगी भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. तसेच सर्व विधी ज्या-त्या जाती धर्मातील पध्दतीने पार पडणार आहेत.वधू-वरांकडील मर्यादित नातलंग व पांहुण्याच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. यासाठी गरजूनी लाभ घेऊन जत तालुक्यातील डॉ.रविंद्र आरळी,उमा हॉस्पिटल जत येथे गुरूशांत माळी 7798168399 येथे इच्छूंक वधू-वरांनी दोन फोटो, जन्मतारखेचे पुरावे,आधार कार्ड आदी कागदपत्रासह 15 मे पुर्वी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here