जत | कारवाईचा फार्स,दिवसाढवळ्या वाळू तस्करी | www.sankettimes.com

0

कुडणूर, डफळापूर मधील चित्र : प्रशासनाच्या नाकावर ठेचून एका पदाधिकाऱ्यांची अवैद्य वाळू वाहतूक सुसाट

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सर्वत्र वाळू तस्करी रोकण्यात जत महसूल प्रशासनाला यश आले आहे. मात्र कुडणूर, शिंगणापूर ओढापात्र याला अपवाद आहे.महसूलच्या काही कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजही वाळू तस्करी सुसाट सुरू आहेत.

ता.28 मार्चच्या दैंनिक संकेत टाइम्सच्या अंकात याविषयीचे वृत्त छापाच महसूल विभाग खडबडून जागा झाला होता. गुरूवार रात्रभर डफळापूर मंडल विभागातील अधिकारी व कर्मचारी ओढापात्रात ठाण मांडून होते.त्यामुळे गुरूवारी वाळू तस्करी बंद होती.मात्र शुक्रवारी ती कायम झाली.शुक्रवारी सकाळी 9 वाजता कुडणूर मधील एका पदाधिकाऱ्यांची संबधित टँक्टरमधून बेंळूखी हद्दीत दोन टँक्टर बेधडक वाळू घेऊन जाताना दिसले.जत,संख प्रशासनचे अधिकारी रात्रीचा दिवस करून वाळू तस्करी रोकून जतला चांगले दिवस आणत असताना जत पश्चिम भागातील वाळूचे केंद्र असणाऱ्या कुडणूर, शिंगणापूर ओढापात्रातील तस्करी त्यांच्या कामावर पाणी फिरवत आहेत.स्थानिक कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून वाळू तस्करी सुरू आहे. पदाधिकारीच यात गुंतले आहेत.त्यांना छापा टाकणाऱ्या अधिकारी कार्यालयाबाहेर पडताच माहिती पुरविण्याचे काम महसूल विभागाच्या काही कुरियर कर्मचाऱ्याकडून होते. त्यामुळे वाळूची एकही गाडी आजपर्यत सापडत नाही.मात्र अधिकारी माघारी फिरताच वाळूचे टँक्टर सुसाट दिवसाढवळ्या परिसरात ओतले जात आहेत.ओढापात्राला ओसाड करून शेतकऱ्यांचा अंत जवळ आणणाऱ्या वाळू तस्करावर खंरच कारवाई होणार का? जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनीच वाळू तस्करी पकडल्यावर प्रशासन जागे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दक्षता कमिटी स्थापन करासंखच्या धर्तीवर कुडणूर,शिंगणापूर मध्ये वाळू तस्करी रोकण्यासाठी संरपच, तलाठी, कोतवाल, व शेतकऱ्यांची दक्षता कमिटी स्थापन करावी जेणेकरून त्या कमिटीकडून वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळेलं.त्यामुळे कारवाई करणे सोयीचे पडेल.अशी मागणी होत आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.