डिजिटल शिक्षणाचे पर्व सुरू असताना हायस्कूल आजही स्वातंञ्यपुर्व काळातील स्थितीत
उमराणी,प्रतिनिधी : शैक्षणिक दर्जा राज्यभरात जागतिक स्पर्धा करत असताना जत तालुक्यातील उमराणीतील स्थानिक संस्थेचे हायस्कूल आजही स्वातंञ्यपुर्व काळातील स्थितीत आहे. सुविद्याचा तर वणवा आहेच पंरतू विद्यार्थ्यांचा दर्जाही पुर्णत: घसरलेला आहे.त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी संस्थेवर प्रशासक नेमून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या स्वप्नातील डिजिटल शिक्षणाचे पर्व आणावे अशी मागणी होत आहे.
तालुक्याचे शेवटचे गाव असलेले उमराणी गाव इतिहासात अजमाअमर आहे.येथे छ. शिवाजी महाराजचे सरसेनापती प्रतापराव गुजर व आदिलशाही सेनापती अब्दुल करिम बहालोलखान यांच्यात झालेले युध्द उमराणी या गावी झाले होते. इतिहासात उमराणीचा उल्लेख आढळतो.अशा उमराणीत देशाला स्वतंत्र मिळून साठी ओंलाडली तरीही येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याना बसण्यासाठी बेचेस नाहीत. भाड्याच्या जिर्ण घरात चालविले जात असलेले हायस्कूल डिजिटल शिक्षणाचा नारा देणाऱ्या सरकारच्या खरं चित्र स्पष्ट करणारे आहे. कायम दुर्लक्षीत राहिलेल्या या हायस्कूलला मान्यता प्राप्त होऊन चाळीस वर्षे झाली आहेत.हायस्कूलला स्वत:ची इमारत,स्वच्छतागृह,ऑफिस किंवा अन्य कुठल्याही विभागाचे कार्यालये नाहीत. गावातील जिर्ण घरात ह्या हायस्कूलचे पाचवी,ते दहावी पर्यतचे वर्ग बसविले जातात. अंरूद खोलीत एकाच खोलीत दोन वर्ग बसवावे लागतात.शिवाय बसण्यासाठी फरसीही नसल्याने विद्यार्थ्यांना घरातून बसण्यासाठी पोते किंवा अन्य साहित्य आणावे लागत आहे. संस्थेच्या चालकांचे लक्ष नसल्याने शिक्षक फक्त पगारापुर्ते काम करून जातात.त्यांचेही विद्यार्थी शिकविण्याकडे लक्ष नसते.त्यामुळे शिक्षण येथे यज्ञ बनला आहे.देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना पन्नास वर्षापुर्वीचा शैक्षणिक दर्जा खरचं उमराणीतील नव युवकांना महासत्ता देशाचे सदस्य होणे भाग्यात आहेत काय? सर्वत्र डिजिटल शिक्षणाचे पर्व सुरू आहे.पैसे देऊन पांल्याना शिक्षण देणारे पालक या शाळेत मुलांना घालत नाहीत. सामान्य शेतकरी, शेतमजूर व गरिब जनतेची मुले नाईलास्तव या शाळेत शिकत आहेत.त्याचे भविष्य अंधकारमय झाले आहेत. या सर्व परिस्थिती असतानाही ना स्थानिक प्रतिनिधी लक्ष देतो ना शासकीय अधिकारी शाळेकडे बघितले तर कितेक दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे डोकावल्याचेही दिसत नाही. त्यामुळे काहीही चाळीस वर्षात बदल झाला नाही.त्यामुळे गरीब विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी संस्थेवर प्रशासक नेमणे गरजेचे आहे. शिक्षण सभापती तम्मानगौंडा रवीपाटील यांनी या शाळेस भेट देऊन कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
संस्था आटपाडी येथील एका खाजगी संस्थेस चालविण्यासाठी देण्याबाबत बोलणी झाल्याचे कळते मात्र आजही जैसेथे स्थिती कायम आहे.कोण बदलणार उमराणीतील नव युवकांचे भाग्य असा सतंप्त सवाल पालकांतून विचारला जात आहेत.





