जत I ग्रामीण भागातही ‘फिल्टर’च्या पाण्याला वाढती मागणी I www.sankettimes.com

0


            


उन्हाळ्याच्या झळा तीव्र : छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचीही फिल्टरच्या पाण्यालाच पसंत

जत,(प्रतिनिधी) – सध्या उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून शहरीभागापाठोपाठच ग्रामीण भागातही फिल्टरच्या पाण्याला (आरओ) कमालीची मागणी वाढली आहे. गावागावातील छोटे-मोठे व्यावसायीकही फिल्टरच्याच पाण्याला प्राधान्य देत आहेत. आधुनिक जारद्वारे थंड पाणीही देण्याची व्यवस्था असल्याने अनेक ठिकाणी घराघरामध्येही फिल्टरचेच पाणी वापरले जात आहे. 
मागील तीन वर्षे कमीअधिक प्रमाणात दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे पाण्याचे संकट सर्वत्रच होते. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर भटकंतीची वेळ आली होती. त्यावेळी अनेकांनी फिल्टरच्या पाण्याचे प्लांट ग्रामीण भागातही सुरू केले होते. अगदी शहरी भागाप्रमाणेच व्यवसायाच्या ठिकाणी, घरी जारची पोहोच सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ लागली. दुष्काळी स्थिती असल्याने अनेकांनी त्यावेळी जारमधून मिळणारे पाणीच वापरले. ठराविक रक्कम मोजून पाणी घेतले जाते. त्यानंतरही अनेकांनी जारमधून येणारे फिल्टरचे पाणी घेणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातही मोठ-मोठ्या गावांमध्ये फिल्टरच्या पाण्याचे व्यवसाय थाटले आहेत. सध्या तरी घरोघरी माठांची जागा जारने घेतल्याचे चित्र आहे. 
या निमित्ताने एक नवाच व्यवसाय ग्रमामीण भागात जोर धरू लागला आहे. त्यामुळे जार व्यवसायीकांचे धंदे तेजीत असून या व्यवसायाला चालना मिळत आहे. गेल्या दोन-तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षी जारचे भाव अजून तरी स्थिर आहेत. 20 लीटर पाण्यासाठी 20,30 आणि 40 रुपये असे मोजावे लागतात. जारचे पाणी थंड व क्षारमुक्त असल्याने आरोग्यासाठीदेखील लाभदायी ठरत आहे. जारच्या पाण्याची मागणी वाढल्याने माठ विक्रीतही घट झाल्याचे व्यावसायीकांचे म्हणणे आहे. जत शहरासह षफळापूर,बिळूर,माडग्याळ,उमदी,शेगाव,दरिबडची,संख,कोंतेबोबलाद आदी गावे मोठ्या बाजारपेठेची आहेत. या प्रमुख गावांमध्ये पाणी फिल्टरचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. काही ठिकाणाहून आसपासच्या गावांमध्येही जारचे पाणी वाहनातून पोहोच केले जाते. विविध दुकाने, हॉटेल, रसवंतीगृह, दवाखाने, जनरल स्टोअर्स, किराणा आदी व्यावसायीक दुकानातील कर्मचारी, ग्राहकांसाठी फिल्टरचेच पाणी घेतात. विविध छोटे-मोठे कार्यक्रम, लग्न, साखरपुडा, जागरण-गोंधळ आदी ठिकाणीही आता सर्रास फिल्टरचेच पाणी वापरले जाते. फिल्टरचे पाणी हा एक स्टेटस सिम्बॉल बनत आहे

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.