जिरग्याळ तलाव I नावे चुकलेल्या शेतकऱ्यांची नावे दुरूस्ती व नुकसान भरपाईसाठी प्रशासनाची तयारी I www.sankettimes.com

0
18

  

डफळापूर,वार्ताहर : जिरग्याळ ता.जत येथील रखडलेल्या तलावाचे काम मार्गी लागण्याचे चिन्हे दिसत आहेत. नुकतीच पांटबंधारे विभाग,प्रांताधिकारी कार्यालय व जिरग्याळ पदाधिकारी,शेतकरी यांची संयुक्तिक तिसरी बैठक जिरग्याळ येथे संपन्न झाली. जिरग्याळ येथील रखडलेल्या तलावाचे काम पुर्ण करावे,तलाव लाभ क्षेत्रातील जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी होती,प्रंसगी अंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.त्यावर प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे.प्रांरभी  तहसिलदार,प्रांताधिकारी,जिल्हाधिकारी यांच्याशी यापुर्वी बैठका संपन्न झाल्या आहेत.त्यातिल अन्य सर्व त्रुटी हटविण्यासाठी जिरग्याळ येथे बैठक झाली.तीत नावे चुकलेल्या शेतकऱ्यांची नावे दुरूस्ती करणे,नुकसान भरपाई देणे,काम सुरू करणे आदी विषयावर चर्चा झाली.

यावेळी जलसंधारण लघूसिंचन विभागाचे विभागीय अभिंयता बी.एम.तेली,बि.व्ही.पाटील, प्रांत कार्यालयाचे अव्वल कारकून,जलबिरादरीचे अंकुश नारायणकर संरपच दिपक लंगाटे,सांगर साळुंखे,संतोष बंडगर,आदी मान्यवर उपस्थित होते.

जिरग्याळ ता.जत येथील बैठकीत तलावप्रश्नी अडचणी संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना संरपच दिपक लंगाटे 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here