जत I मणके निकामी,कधी करणार रस्ते दुरूस्ती I www.sankettimes.com

0

   

नगरपालिका हद्दीतील रस्त्याची पुर्ती वाट : अनेक रस्तावर पावलागणिक खड्डे

जत,प्रतिनिधी : जत शहरातील रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्ता उखडल्याने सर्वच रस्त्यावर शेकडो ठिकाणी खड्डे पडले आहेत. पादचार्‍यांसह वाहनधारकांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

शहरातील उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. मागील 15-20 वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शहरातील स्टेट बँकेसमोरील,नगरपालिका समोरिल रोड,बिंळूर चौक ते राजवाडा,शिवाजी चौकाकडे जाण्यासाठीचे मुख्य रस्ते पावलाच्या अंतराला उखडेलेले आहेत. जास्त रहदरी असल्याने रस्ता अल्पावधीतच खराब झाला. दरम्यानच्या काळात स्थानिक प्रशासनाने मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविले; पण दोन-चार महिन्यांतच शहरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले आहेत. सद्य:स्थितीत रस्ता अनेक ठिकाणी उखडला असल्याने रस्त्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. रस्त्यावर खडी पसरून जागजागी खड्डे पडले आहेत.या शिवाय काही रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने रस्ता अरुंद झाले आहेत. या रस्त्यावरून नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. सायंकाळच्या वेळी तर रस्ते पूर्ण जाम होतात.  खड्डे व खडीमुळे वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

लवकर रस्ता करावा
शहरातील रस्त्याची वाईट अवस्था असून, रस्ते उखडले आहे. अंतर्गत सर्व मुख्य रस्ते खराब झाल्याने पादचार्‍यांसह वाहनधारकांनाही त्रास होत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नपाने रस्ता लवकर करावा; अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असा नागरिकांनी दिला आहे.

मणक्यांचा त्रास

Rate Card

मागणी करूनही रस्ता दुरुस्त केला जात नाही. विद्यार्थ्यांना खड्ड्यांतून ये-जा करावी लागत असल्याने लहान वयातच मणक्यांचा त्रास होत आहेत.

जत शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिकांना मरणकळा देत आहेत.

अटैचमेंट क्षेत्र

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.