आग विजविताना आग लागल्याने वृध्द शेतकऱ्यांचा भाजून मुत्यू

0

जत, प्रतिनिधी;जत

तालुक्यातील देवनाळ येथील वयोवृद्ध शेतकरी बिरा गेनू दुधाळ (वय-70)यांचा आगीत हाेरपळून मृत्यू झाला. दुधाळ हे शेतातील गवत पेटवत असताना अचानक त्यांच्या धोतरास आग लागली. त्यात ते गंभिररित्या भाजून जखमी झाले. ही दुर्घटना आज(गुरुवार)  दुपारी तिन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rate Card

              माहिती अशी की, देवनाळ पासून  एक किलोमीटर आंतरावरील दुधाळ मळ्यात बिरा दुधाळ,त्यांची पत्नी जनाबाई,मुलगा तुकाराम उर्फ बंडा,सून महानंदा व दोन नातू  असे सहाजण राहतात. गुरूवारी दुपारी तिनच्या दरम्यान शेतातील बांधावरील वाळलेले गवत पेटविल्यानंतर बांध स्वच्छ  होईल म्हणून बिरा दुधाळ यानी गवत पेटविले होते.कडक ऊन व जोरदार वारे वाहत असल्यामुळे आग आचानक पसरत गेली.ज्वाळा त्यांच्या धोतरास लागली. धुरामुळे त्यांच्या धोतरास केंव्हा लागली ते त्याना समजले नाही. त्यांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून घरातील इतर नातेवाईक यांनी शेताकडे धाव घेतली. मात्र त्यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला.

        सदर घटनेची माहिती निवासी नायब तहसीलदार गुरुबसव शेट्यापगोळ यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पंचनामा करण्यासाठी आदेश दिले आहेत. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.