अंकलगी,संख,वार्ताहर:अंकलगी (ता-जत)येथे दारुपिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीला कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.शेजाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.शाहीन अजमद मुलाणी असे जखमी पत्नीचे नाव आहे.याबाबतचा गुन्हा उमदी पोलिसांत दाखल झाला आहे.
घटनास्थळ व उमदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,अंकलगी येथील अजमद फरदीन मुलाणी हा मुळचा म्हैसाळ येथील आहे.सध्या सासरवाडी असलेल्या अंकलगी येथे कुंटूबासह राहतो.तेथे छोटे किराणा दुकान आहे. पत्नीचा कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे.अजमदला दारूचे वेसन असल्याने तो पत्नी शाहीन कडे सतत पैसे मागत असतो.सततच्या पैसे देण्याने वैतागलेल्या शाहीनने बुधवारी पैसे न दिल्याने अजमदने रागाच्या भरात रात्री सव्वा नऊच्या सुमारास शाहीनवर अचानक कोयत्याने सफासप वार करण्यास सुरूवात केली.अचानक झालेल्या हल्ल्याने शाहीनने आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले.शाहीनची सोडविले.तोपर्यत हल्लेखोर अजमद पळून गेला.शाहीनवर मान,डोके,पाठीवर कोयत्याचे वार झाल्याने प्रकृत्ती चिंताजनक आहे.शाहीन यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान जखमी शाहीनची आई हायातबी मुजावर यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली.पती अजमद फरारी आहे.घटनास्थळी डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे यांनी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या.अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे करत आहेत.





