जत | पुर्व भागातील जि.पच्या शाळांचा दर्जा खालवला : विक्रमसिंह सांवत | www.sankettimes.com

0

कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांची शिक्षण मंञ्याकडे तक्रार

जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील कन्नड व मराठी शाळाचा दर्जा खालावल्याने विद्यार्थी संख्या घटली आहे.पालक नाईलास्तव आर्थिक झळ सोसत विद्यार्थी गुणवत्ता असणाऱ्या लगतच्या कर्नाटक राज्यातील गावातील शाळेत घालत आहे.त्यासाठी पालकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे पुर्व भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारावा अशा  मागणीचे निवेदन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना कॉग्रेस नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रमसिंह सांवत यांनी दिले.

Rate Card

निवेदनात म्हटले आहे की,गेल्या काही दिवसापासून सिमेलगतच्या गावात बोली भाषा कन्नड व मराठी शाळाचा दर्जा पुर्णत: खालावलत आहे.याकडे संबधित पंचायत समिती,जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सिमावर्ती भागातील बंहुताश ऊसतोड मंजूर,अल्प भुधारक शेतकरी,मजूर,व सामान्य नागरिकांना आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणासाठी कर्नाटक राज्यातील लगतच्या गावातील शाळेत घालावे लागत आहे.तेथे जाण्यासाठी व शैक्षणिक खर्च म्हणून सिमावर्ती भागातील पालकांना वर्षाकाठी वीस हाजाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे.काही पालकांची परिस्थिती नसल्याने ते जिल्हा परिषद शाळात पाल्यांना घालतात.तेथे शैक्षणिक दर्जा नसल्याने त्या विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे मोफत शिक्षण हक्कावर गदा येत आहे. त्यामुळे आपण स्वत: सिमावर्ती जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व तातडीने दर्जा सुधारावा यासाठी संबधित विभागाला आदेश द्यावेत असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.