जत | तिसऱ्या वॉटर कँप स्पर्धेची प्रशिक्षण अतिंम टप्यात | संकेत टाइम्स |www.sankettimes.com

0

 दुष्काळाकडून संमृध्दीकडे :  जत तालुक्यातून उर्त्स्फुत सहभाग बदलणार जलसंधारण

जत,प्रतिनिधी : राज्यात तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, सहभागी गावातील कारभाऱ्यांना पाणी, जलसंधारणाचे प्रशिक्षण देण्यात येऊ

लागले आहे.सातारा जिल्ह्यात यावर्षी 13 सेंटर सुरू असून, त्या माध्यामातून साताऱ्याबरोबरच पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील गाव कारभाऱ्याना

Rate Card

मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे.  हे प्रशिक्षण 15 मार्चपर्यंत संपविण्यात येणार आहे. जत तालुक्यातील अनेेेक गावच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षण घेऊन आले आहे. ऩव्याने नुकतेच उटगी, येळवीसह अनेक गावातील लोकप्रतिनिधी प्रशिक्षणास रवाना झाले आहेत.राज्यात गेली तीन वर्षे वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. सातारा जिल्ह्याचा सहभाग प्रत्येकवर्षी मोठा राहिलेला आहे. हा सहभाग लक्षात घेऊनजिल्ह्यातील ट्रेनिंग सेंटरची संख्या तेरावर गेली आहे.यापूर्वी कोरेगाव तालुक्यातील आठ केंद्रांवरच स्पर्धेत सहभागी असणाऱ्या गावातील लोकांना प्रशिक्षण मिळायचे; पण वाढता सहभाग लक्षात घेऊन माण तालुक्यात चार आणि खटाव तालुक्यात एक सेंटर यावर्षी सुरू करण्यात आले आहे.या सेंटरवरती जिल्ह्यातील जत तालुक्यातील अनेक  सहभागी गावातील लोकांना ट्रेनिंग देण्यात येत आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावेही मार्गदर्शन घेऊन जात आहेत.दरम्यान जत तालुक्यातील सहभागी गावाची संख्या वाढली आहे. त्यामुळे यंदा मोठे जलसंधारण होणार हे निश्चित आहे.दुसऱ्या वॉटर कप मधील जलसंधारण झालेल्या गावात पाणी टंचाई संपण्याच्या स्थितीत आहे.तेथील पाणी पातळी वाढून शेती बहरली आहे.यंदाच्य वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावे जलसंधारणाचे महत्व ओळखूंन तयाराीला लागले आहेत.

शेवटच्या टप्यातील प्रशिक्षणास जत तालुक्यातून रवाना झालेले गावकरी 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.