जत,प्रतिनिधी :ऐन हंगामात द्राक्षांवर घसरत्या दराची कुर्हाड कोसळली आहे. दरात झपाट्याने झालेल्या घसरणीमुळे द्राक्ष उत्पादक उपाशी अन् खरेदीदार व्यापारी, दलाल मात्र तुपाशी अशी स्थिती द्राक्ष उत्पादकांना अभुवण्यास येत आहे. तर दरातील घसरगुंडीमुळे चांगल्या प्रतिची निर्यातक्षम द्राक्षे कवडीमोल दराने स्थानिक बाजारात विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.दलालाच्या एकाधिकारशाहीने शेतकऱ्यांचे बेहाल सुरू आहेत.
द्राक्षांना नाशिकच्या द्राक्षांच्या जोडीने मागणी आहे. द्राक्षांच्या उत्तम प्रतिसाठी येथील वातावरण अत्यंत अनुकूल असे आहे. मात्र दुष्काळ परिस्थिती ही येथील शेतकर्यांसाठी कायमची असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. यंदा मान्सून रिटर्नने साथ दिल्याने शेती चांगली आहे.त्यामुळे द्राक्षाचे क्षेत्र वाढल्याचा परिणाम दर पाडण्यावर होत असल्साचा शेचकऱ्यांचा आरोप आहे.हे सारे व्याप करुनदेखील आज भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दर अस्थिरतेच्या दुष्टचक्रात अडकला आहे. शेतकर्यांनी मोठा खर्च आणि काबाडकष्ट करुन पिकवलेल्या उत्तम प्रतिच्या द्राक्षांना व्यापारी वर्गाकडून योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. ता उन्हाळा वाढू लागला आहे. द्राक्षबागा जगविण्यासाठी काही ठिकाणी पाण्यासाठी खर्च करावा लागतो आहे. बागांना लागणार्या महागड्या औषधांचा खर्च ही वाढताच राहिला आहे. या सार्या स्थितीत द्राक्षांना हमीभाव मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





