कॉग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने जत तालुक्याचीही मोठी हानी : मान्यवरांच्या प्रतिक्रिया

0

Rate Card

जत,प्रतिनिधी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने सगळ्यात मोठी हानी ही काँग्रेस पक्षाची झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहत कदम साहेबांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.जत येथील हनुमान मंदिरासमोर शोक सभेचे आयोजन केले होते.दिवंगत पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रंध्दाजली वाहण्यात आली.कदम यांनी जतसाठी मोठे कार्य केले होते.त्यांच्या मुशीतून तयार झालेल्या नेत्यामुळे कॉग्रेसला बळकटी मिळाली होती.त्यामुळे जतची राजकीय कमान बराच काळ कॉग्रेसच्या किंबहुना डॉ.पतंगराव कदम यांच्या हातात होती. त्यांचे जतवर विशेष लक्ष होत. 

पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. पतंगराव यांच्या आठवणीना उजाळा देताना स्व:ताला आलेली साहेबाचे अनुभव व्यक्त करण्यात आले. पतंगराव कदम यांनी राजकारण आणि सामजिक कार्यात वेगळा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या सत्तेचा नेहमी सर्वसामान्य जनतेला फायदा करून देण्यासाठी उपयोग केला,अजूनही जतच्या सर्वागिंन विकासासाठी पतंगराव कदम हवे होते अशी भावना यांवेळी अनेकांनी व्यक्त केली.

जत ;शहरात दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांच्या शोक सभेत बोलताना माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील  व मान्यवर, यावेळी डॉ.कदम यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.