काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचं निधन

0
7

मुंबई :काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचं निधन झालं. लीलावती हाॅस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते.

पतंगराव कदम.. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं नाव. महसूल, सहकार, वन, मदत आणि पुनर्वसन.. अशी महत्वाची खाती ज्यांनी हाताळली.. 1967 साली भारती विद्यापीठाची त्यांनी नुसती स्थापनाच केली नाही पण या रोपाचं वटवृक्ष करून दाखवलं. देश-विदेशात मिळून या विद्यापीठाची 180 महाविद्यालयं आणि संस्था आहेत. इतकं मोठं कार्य करणाऱ्या या नेत्याची सुरुवात मात्र तशी खडतरंच झाली..

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here