नसीर शेख चाकू हल्ला प्रकरण : पुतण्यानां 12 मार्चपर्यत पोलिस कोठडी

0

जत,प्रतिनिधी : जत शहरात मंगळवारी किरकोळ कारणावरून काकावर  झालेल्या चाकू हल्ल्यातील 2 पुतण्यानां न्यायालयात हजर केले असता 12 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली.

मंगळवारी शहरातील स्टँडसमोर राहणारे नासीर शेख व त्यांच्या पुतण्याच्यांत घरगुती कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्यातून पुतणे अमिर शेख व नौशाद शेख यांनी जत सांगली रोडवरील प्रांत व पोलिस कार्यालया नजिक पुतण्यानी रांगाच्या भरता काका नासीरला चाकूने बोकसले होते. दरम्यान पोलिस निरिक्षक राजू तासिलदार, गजानन कांबळे व काही पोलिसांनी प्रसंगावधान राखत तातडीने पळत जाऊन हल्लेखोर पुतण्यांना पकडत जखमी नसीर यांना रुग्णालयात हलविले होते.रात्री उशिराने जत पोलिसात याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला होता.

Rate Card

दरम्यान बुधवारी पुतण्यानां न्यायालयात हजर केले असता 12 मार्चपर्यत पोलिस कोठडी सुनावली.दरम्यान जखमी नसीर यांच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे कळतेयं. नेमका हल्ला कशा कारणावरून झाला,यांचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.