बाज साकली सुलतान पीर ऊरूस : 40 पोलिसाचे विशेष पथक तैनात

0
9

जत,प्रतिनिधी : बाज येथील साकली सुलतान पीर गायकवाड बाबा उरूस शांततेत संपन्न व्हावा,कोणतेही वादाचे प्रकार होऊ नयेत यासाठी जत पोलिसाची स्पेशल फोर्स बाजमध्ये तैनात करण्यात आली आहे. कोणतेही गालबोट न लावता ऊरूस शांततेत साजरा करावा,कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस निरिक्षक राजू तासिलदार यांनी केले.

बाज ग्रामपंचायत निवडणूकी दरम्यानच्या घटना गृहीत धरून पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. ऊरूस काळात कोणत्याही वादाच्या घटना घडू नयेत यासाठी 40 पोलिसाचे दंगलनियत्रण पथक बुधवार पासून बाजमध्ये सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पाठविण्यात आले आहे. मीही स्वत: बाजवर लक्ष ठेऊन आहे.कसल्याही घटनेनंतर आम्हीही अर्ध्या तासात बाजमध्ये पोहचू शकतो.त्यामुळे उत्साही नेते कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी धार्मिक विधी शांततेत पार पाडावा,कायदा सुव्यवस्था बिघडवू नये असेही तासिलदार यांनी शेवटी म्हणाले

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here