डफळापूर,वार्ताहर : जत तालुक्यातील डफळापूर येथे नव्याने सुरू झालेल्या पुकळे उद्योग समुहाच्या प्रत्यक्ष उत्पादनास सुरूवात झाली आहे.
पुकळे उद्योग समुहातील वृंदावन इंडस्ट्रिजच्या मक्की चुनी उत्पादनास सुरूवात झाली आहे. दुधाळ जनावरांना दुध वाढीसाठी या चुन्नीचा उपयोग होणार आहे.जत,कवटेमहाकांळ,आटपाडी तालुक्यासह कर्नाटक सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांना माफक दरात हे उत्पादन उपलब्धं करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन संचालक पोपटराव पुकळे यांनी केले.






