बाजमधील साकली सुलतान पीर गायकवाड बाबा उरूस मोठ्या उत्साहत साजरा करणार : संरपच सौ.कमल गडदे

0


डफळापूर,वार्ताहर: बाज(ता.जत) येथील साकली सुलतान पीर गायकवाड बाबा उरूस सालाबादप्रमाणे ता.7,8,9 मार्च रोजी मोठ्या उत्साहत साजरा करण्यात येत आहे.उरूसाची सर्व जयत तयारी पुर्ण असल्याची माहिती संरपच सौ.कमल संजय गडदे व उपसंरपच प्रभाकर अरविंद खरात यांनी दिली.ऊरूसानिमित्त आयोजित

निकाली कुस्तीसाठी मैदानात 51 हाजाराच्या कुस्तीसाठी संभाजी पवार तालिम सांगलीचा पै.नाथा पालवे,विरूध पै.राजेंद्र शिंदे तालमी बेनापूरचा पै.जालिंदर म्हारगुडे लढणार आहेत.यासह अन्य 19 निकाली कुस्त्यांचे आयोजन केले आहे.

Rate Card

बाज येथील जनतेनी आम्हाला नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे.दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लोकहिताचे प्रशासन,धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहत साजरे करणार आहोत.परिवर्तनाची सुरूवात आता झाली आहे,जनहिताला प्राधान्य देत आमचे सर्व नेते, पँनेल प्रमुख, कार्यकर्ते,समर्थक ग्रामस्थ काम करत आहेत.त्यामुळे बाजमध्ये नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे.

त्याचाच भाग म्हणून परिसरातील प्रसिध्द देवस्थान साकली सुलतान पीर गायकवाड बाबा उरूसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान,वाळूचे पोती वाहून नेहण्याच्या शर्यती,कमल कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा,तुमच्यासाठी कायपण लावणीचा भव्य करमणुकीचा कार्यक्रम,व विविध धार्मिक विधीचे आयोजन केले आहे. उरूसानिमित्त दर्गापरिसर शुशोभिकरण,भव्य कुस्तीसाठी आखाडा, विद्युत रोषणाई करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे भव्य ऊरूसाचे कार्यक्रंम होणार आहेत. याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ. गडदे व खरात यांनी केले आहे.यावेळी पँनेलचे नेते तम्माना गडदे सर, अरविंद गडदे, संजय गडदे (माजी संरपच) ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री प्रविण गडदे,संजय गडदे,सौ.अनुसया गडदे,येसाबाई खरात,संगिता गडदे, सोनाबाई गुरव,राणी ऐवळे आदि उपस्थित होते.

यात्रा कार्यक्रम असा बुधवार 7 मार्च गंध ओहोटी व गलफ चढविणे,सकाळी 7 वाजता धार्मिक विधी,रात्री 9 वाजता तुमच्यासाठी कायपण हा भव्य लावणीचा कार्यक्रम,गुरूवार 8 मार्च देवास नैवेद्य देणे : सकाळी धार्मिक विधी रात्री 9 वाजता कमल वनित

 कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा, शुक्रवार ता. 9 मार्च, मुख्य दिवस : सकाळी 8 वाजता वाळूचे पोती वाहून नेहण्याच्या शर्यती, सायंकाळी 4 वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान त्यात महत्वाच्या 19 कुस्त्यासाठी 38 मल्लाच्या निर्णायक कुस्त्या होणार आहेत. याशिवाय अन्य कुस्त्याचेही आयोजन केले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.