महा.राज्य विधीसेवा प्राधिकरण आयोजित डफळापूरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

0
18

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण मुंबई यांचे अंतर्गत डफळापूर ता.जत येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.तालुका विधी सेवा समिती जत,जत पंचायत समिती,ग्रामंपचायत डफळापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या शिबिराचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.जी.भोसले यावेळी उपस्थित होते.तर दिवाणी न्यायाधीस क.स्तर सौ.एस.आर.पाटील,सह दिवाणी न्यायाधीस क स्तर एस.डी.वाघमारे,गटविकास अधिकारी श्री. चिल्लाळ,विस्तारधिकारी श्री.जाधव,श्री.चव्हाण, जत बार उपाध्यक्ष अॅड.हादिमणी व त्याचे सहकारी विधीज्ञ,जेष्ठ नागरिक सेवा संघ डफळापूरचे सदस्य,ग्रामंपचायतचे पदाधिकारी,सदस्य, जत न्यायालय,पंचायत समितीचे कर्मचारी, विधी सेवा समितीचे स्वयंसेवक,जेष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका,महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात असंघटीत क्षेत्रातील कामगारासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना,जेष्ठ नागरिकांचे अधिकार,तृतीयपंथीविषयी असणाऱ्या अडचणी,समस्या,व त्यावरील उपाययोजना,अपघात विमा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत असणाऱ्या विविध योजना व कायदेविषयक मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.

डफळापूर :महा.राज्य विधीसेवा प्राधिकरण आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांत बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.जी.भोसले बाजूस क.स्तर दिवाणी न्यायाधीस सौ.एस.आर.पाटील,एस.डी.वाघमारे व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here