उमदी,संख,खंडनाळमध्ये 33 ब्रास वाळूसाठा जप्त

0
6

जत,प्रतिनिधी :संख बोर नदीपात्रातील 3 ब्रास व खंडनाळ येथे 30 ब्रास वाळूसाठा जप्त केली.तहसिलदार अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 जत तालुक्यातील वाढलेल्या वाळू तस्करी रोकण्यासाठी जत महसूल पथकाची पथके दररोज छापा मारी करून वाळू तस्करी रोकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.त्यापाश्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. जप्त वाळूचा संख अप्पर तहसिल कार्यालय आवारात ठेवण्यात आली आहे. यांचा लिलाव काढून शासकीय नियमानुसार ही वाळू विकण्यात येणार आहे.

उमदीत अवेद्य वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला

उमदी,वार्ताहर:उमदी (ता.जत)येथे अवैद्य वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर उमदी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की,उमदी ते विजापुर मार्गावर अवैध वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याने त्या मार्गावर सापळा रचून उमदी पोलिसांनी कारवाई केली. अमोगसिध्द मंदिराजवळ एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला, चालक आमसिध्द लक्ष्मण पुजारी (वय -19)व मालक दिलीप बाळासाहेब शेवाळे (वय- 25, दोघे राहणार उमदी) या दोघाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यातील चालक आमसिध्द पुजारीस अटक केली आहे. तर मालक दिलीप शेवाळे हा फरार असल्याची माहिती पोलिसाकडून मिळाली.

जत: संख,खंडनाळमध्ये 33 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here