जत तालुका टँकर मुक्तीच्या वाटेवर! जलयुक्त शिवार व पाणी फौंडेशनच्या जलसंधारणाचा परिणाम

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दुष्काळी गेल्या गत वर्षांत पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. तर जत तालुक्यातील जवळपास 50 वर गावे ही वॉटर कपमधील सहभागामुळे सध्यस्थितीत टँकरमुक्त झाली आहेत. त्याचप्रमाणे जत तालुक्यातीलही सर्वच गावे टँकरमुक्तीच्या वाटेवर आहेत.गत वर्षी डिंसेबर पासून काही गावात टँकर लावण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदा आजही अनेक गावातील जलाशयात पाणी साठे उपलब्धं आहेत.

Rate Card

राज्यात तीन वर्षांपासून अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गतवेळी तालुक्यातील अनेेेेक गावांनी सहभाग नोंदविला आहे.त्याचे फलित यावर्षी मिळाले आहे.पाणी अडविल्याने शेतीसह पाणी टंचाईला हातभार लागला आहे. जत तालुक्यातील 61 गावे या स्पर्धेत उतरली होती.  जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू असून, यावर्षीही तालुक्यातील 50 च्यावर दुष्काळी गावांचा सहभाग राहणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा फायदा असा झाला की दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. उन्हाळ्यातील पिकांसाठीही उपलब्ध पाण्याचा वापर करता येत आहे. जत तालुक्यात तर वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जवळपास सध्यस्थितीत यावर्षी एकाही  गावात टँकर सुरू करायला लागणार नाहीत. डफळापूर सह अनेक गावाला तर दरवर्षी डिसेंबर महिन्यातच पाण्यासाठी टँकर सुरू करायला लागायचा.लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लागायची. पण, यावर्षी तेथील चित्र बदलले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी असणारी विहीरी सध्यस्थितीत भरलेली दिसून येत आहे. तर पाणी असल्याने उन्हाळी पिकेही शेतकऱ्यांनी घेतली आहेत. अशाचप्रकारे जत तालुक्यातील गावे टँकरमुक्त होत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.