जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील कॉग्रेसचे नेते,जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका कॉग्रेस कमिटीकडून भव्य सत्कार व पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. या पाणी परिषदेस कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम. बी.पाटील, आमदार मोहनराव कदम, युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी केंद्रिय मंत्री प्रतिक पाटील, विजयपूर बँकेचे एम.आर.पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, कर्नाटक कॉग्रेसचे प्रदेश सदस्य राजू पाटील, बाजार समिती सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनावर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.जत
शहरातील मार्केट कमिटीच्या मैदानात रविवार ता.4 फेंब्रुवारीला या परिषदेचे आयोजन केले आहे. अशी माहिती कॉग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बिराजदार म्हणाले,जत पुर्व भागातील म्हैशाळ योजनेपासून वचिंत 42 गावासाठी तीन वर्षापुर्वा आघाडी सरकारच्या काळात कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधत गुड्डापूर येथे पाणी परिषद घेऊन योजनेची मागणी केली होती. तत्कालीन सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे या योजनेसाठी प्राथमिक खाजगी एंजन्सी कडून सर्व्हे करून पाणी आणायचे कँनॉल,लाभ क्षेत्र,कर्नाटकातील व महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती व खर्चासाठीचा प्रस्ताव तयार करून सरकारकडे सादर केला आहे.त्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला कृष्णा नदीतून पाणी सोडायचे ते कर्नाटकातील तिंकोटा पंपहाऊसमधून दोन वितरक नलिकाद्वारे महाराष्ट्रातील लिप्टद्वारे पुर्व भागात आणायचे असे योजनेचे स्वरूप आहे.त्यात पहिल्या कँनॉलमधून; सिध्दनाथ जवळ भोरनदी पात्रात टाकायचे, दोन;महाराष्ट्रातील तिंकोडी जवळ ओढापात्रात दुसऱ्या कँनॉलद्वारे टाकायचे अशा मुळ योजना आहे. महाराष्ट्रातील या दोन्ही ठिकाणाहून पुर्व भागातील 42 गावांना हे पाणी भौगोलिक परिस्थितीनुसार सायपन पध्दतीने पोहचू शकते. ह्या सर्व माहिती मिळवून कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी आघाडी सरकारपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्याचे महत्व आता युक्ती सरकारला कळाल्यामुळे तेही या योजनेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे सांवत यांनी खाजदार संजय पाटील व आमदार विलासराव जगताप यांना सोबत घेत कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांची भेट घेऊन योजनेची सर्व परिस्थिती सादर केली आहे. योजनेच्या कामास गती आली आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार व कर्नाटक सरकारकडून या योजनेला लवकरच मंजूरी मिळणार आहे. त्या धर्तीवर योजनेच्या कामास मुर्त स्वरूप यावे या उद्देशाने ह्या पाणी योजनेचे आयोजन केल्याचे बिराजदार यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडक उपस्थित होते.
हार तुऱ्याऐवजी वह्या आणाकॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी असते. तालुक्यातील नेते,कार्यकर्ते,सामान्य नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित असतात. वाढदिवसानिमित्त विक्रमसिंह सावंत शुंभेच्छा स्विकारण्यासाठी मार्केट यार्डातील कॉग्रेस कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रर्त्यानी,शाल,श्रीफळ, हारतुरे,बुके आणण्या ऐवजी आपल्यापरीने वह्या आणाव्यात,ह्या वह्याचे होतकरू, गरीब विद्यार्थींना वाटप केले जाणार आहे असेहि यावेळी बिराजदार यांनी सांगितले.