कोंतेबोबलादमध्ये 80 किलो चंदनासह तस्कराला पकडले उमदी पोलिसांची कारवाई

0

उमदी,वार्ताहर:कोंतेबोबलाद (ता.जत) येथे चंदनाची तस्करी करीत असताना कल्लाप्पा बंजत्री रा.हातरगा ता.इंडी जि.विजापुर याला अटक करत 1लाख 45 हाजाराचे 50 किलो चंदन जप्त करण्यात आले.उमदी पोलिसांनी हि कारवाई केली.याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे.

   पोलिसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोंतेबोबलाद येथे चंदन खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहीती  पोलिसांना लागली होती. उमदी पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिस हे त्यांच्या मागावरती होते .पोलिसांना गोपनीय खबऱ्यां कडून को.बोबलाद गावचे हद्दीत उमदी ते विजयपुर रोडवर चेकपोस्टच्या काही अंतरावरच माळी वस्ती जवळ इसम नामे पिंटू उर्फ यल्लप्पा बजेत्री रा. हातरगा ता.इंडी जि. विजयापुर(कर्नाटक) हा मोटार सायकल  क्रमाक के.ए.43 एच.4033 या मोटार सायकल वरून चंदन विक्रीसाठी आणत असल्याची बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे सा.पोलिस निरिक्षक प्रविण संपागे यांनी पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलीस अधीकारी नागनाथ वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भगवान शिंदे पोलिस नाईक सचिन आटपाडकर, पो.का.अर्जुन सगर, पो.का.श्रीशैल वळसंग यांनी सापळा रचत चंदन तस्कराला चंदनाच्या काड्यांसह रंगेहाथ पकडले. आरोपी कडून त्याच्याजवळ लाल रंगाच्या पल्सर मोटार सायकल, चंदनाची झाडे तोडून तासून तुकडे केलेले ओंडके 50, किलो वजनाचे किंमत एकूण 145,000/ रु असा मुद्देमाल मिळून आला.सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करून पुढील तपास पोलीस नाईक सचिन आटपाडकर हे करीत आहे.

Rate Card

    

          

 सन 2004 साली पोलिस अधिक्षक रविंद्र शिसवे यांनी आपल्या प्रशिक्षण कालावधीमध्ये कर्नाटकातुन येणारा मोठा चंदन साठा पकडून कारवाई केली होती. व कर्नाटकातुन हद्दपार अनेक गुन्ह्येगारांनी उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसवलेले अनेक अवैध बंद करत त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उचलला होता. त्यानंतर सुमारे 13 वर्षानंतर चंदन तस्कराविरोधातील हि मोठी कारवाई उमदी पोलिसांनी केली आहे.सिमावर्ती भागात अनेक गुंड टोळ्याकडून अवैद्य धंदे केले जात असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही वर्षात थांबलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे सुसाट आहेत. आज एका कारवाईने ते थांबणार नाहीत. त्यामुळे कारवाईत सातत्य महत्वपुर्ण आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.