उमदी,वार्ताहर :बोर्गी खुर्द (ता-जत) येथील कुशाबा हणमंत कांबळे (वय-22)यास बेदम मारहाण करून त्यांचे राहते घर पेटवून दिले आहे.याबाबतचा गुन्हा उमदी पोलिसात दाखल झाला आहे.
याप्रकरणी तम्माराया बिरादार, चिदानंद बिरादार,दयानंद बिरादार,हणमंत बिरादार, मलकारी बिरादार, सिद्रया बिरादार (सर्वजण रा. बोर्गी) यांच्या विरुध्द कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
कांबळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की,कुशाबा कांबळे हां आई वडीला सोबत स्वतःच्या शेत जमीनात छप्पर व पत्रा शेड मारून राहतो. या जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू आहेत. असे असताना वरील आरोपीनी जमिनीच्या वादाच्या कारणावरून जमाव जमवून घरी येऊन वडील हणमंत याना जातिवाचक शिविगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देवून निघुन गेले,यानंतर कुशाबा यांनी उमदी पोलिसात तक्रार देणेसाठी जात असताना वाटेत तम्माराय बिरादार पुन्हा कुशाबा यांच्या घराकडे जाताना दिसून आला त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे घर जळाल्याचे समजले त्यामुळे वरील आरोपीनेच घर जळाल्याचे संशय व्यक्त आहे .दरम्यान पोलिस पाटील,रामचंद्र उटगी यांनी प्रसंगावधान ओळखून जळत्या घरातून गॅस टाकी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.यामध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य सोने रोख रक्कम असे अंदाजे एक लाखांचे नुकसान झाले आहे.
दोनच महिन्यापूर्वी बालगांव येथे मळसिद्ध कांबळे यांना घराचे बाहेरील कडी घालून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा दुसऱ्या दलितावर जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. जत पूर्व भागात दलितावरील अन्यायात वाढ झाली आहे. पोलिसांनी वेळीच पाऊले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे.