दलितवस्तीमधील साडेआठ लाखाचा रस्ता गायब रामपूर येथील प्रकार : ग्रामसभेत जोरदार खडाजंगी; चर्चा न करताच सरपंचांनी सभा गुंडाळली

0
1

जत, प्रतिनिधी:रामपूर (ता. जत)येथील ग्रामपंचातीने दलितवस्ती सुधार योजनेतून केलेला साडेआठ लाख रूपांयाचा रस्ताच गायब केल्याचा विषय उघडकीस आला आहे.या विषयावरून सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामसभेत जाब विचारला.यावेळी सत्ताधारी व विरोधी गटात जोरदार खडाजंगी झाली. तर सरपंचांनीच चर्चा न करताच सभा गुंडाळली.

बुधवारी रामपूर-मल्लाळ ग्रामपंचायतीची  ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी सरपंच रखमाबाई महादेव कोळेकर, उपसरपंच भारत दादा घाटगे, ग्रामसेवक भास्कर जाधव,माजी उपसरपंच मारूती पवार, माजी सरपंच बिराप्पा माने, सदस्य रमेश कोळेकर, महेश तुरवाले, नितीन शिवशरण, अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामसभेत दलितवस्तीमधील रस्ता कामावरून जोरदार वादंग झाले. सदस्य नितीन शिवशरण यांनी दलितवस्ती सुधार योजनेमधील रस्त्याचा विषय उपस्थित केला. सन 2016-17 मध्ये रस्त्यासाठी

योजनेमधून 8 लाख 50 हजार रूपांयाचा निधी मंजूर झाला होता.या खात्यावर आता केवळ 30 हजार रूपये शिल्लक आहेत. निधी खर्च झाला असला तरी त निधीमधून केलेला रस्ताच जागेवर नाही. रस्ताच गायब झाला आहे. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी शिवशरण यांनी केली.

रस्त्याचा विष़य उपस्थित करताच सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी सभेत गोंधळास सुरूवात केली. तर सरपंच कोळेकर व माजी उपसरपंच पवार हे सभेतून निघून गेले. उत्तर न देता सरपंचांनीच सभात्याग केला आहे. आपला भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून स्वत:च सभेतून पलायन केले असल्याची टीका रमेश कोळेकर यांनी केली. तर आपण याबाबत गटविकास अधिकारी याच्यांकडे लेखी तक्रार केली असल्याचे शिवशरण यांनी सांगितले.

सरपंच कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आपण रितसर सभा संपविली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार सभा घेण्याचा व सभा विसर्जित करण्याचा आपणास अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here