कोंतेबोबलादचे सुपुत्र विनोद सांवत यांना आंतरराष्ट्रीय आवार्ड देऊन गौरव
कोंतेबोबलाद : कोंतेबोबलाद (ता.जत)चे सुपुत्र सांवत ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे चेअरमन विनोद गुलाबराव सांवत यांना जागतिक पातळीवरील “बेस्ट डिलेवरी आवार्ड इन मलेशिया” या अतर्गंत ग्लोबल बेस्ट हे अॅवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करत अमेरिका,दुबई,चायना,मलेशिया, रशिया आशा देशांना सुट्टे पार्टस् ची डिलेवरी मोठ्या प्रमाणात करणाऱ्या इंडस्टिज् ना असे आवार्ड दिले जातात.प्रत्येक देशातून यासाठी तिन इंडस्टिज् निवडल्या जातात. मलेशिया येथे भरगच्च कार्यक्रमात सांवत व कुंटूबियांना हे आवार्ड देऊन गौरविण्यात आले. 2013 पासून सांवत हे या आवार्डचे सलग मानकरी ठरले आहेत. मुळचे कोंतेबोबलाद येथील असणारे सांवत यांचा पुणे येथे फर्निचर क्षेत्रातील सुट्टे पार्टस् बनविण्याची मोठी इंडस्टिज् आहे. तेथे बनविलेले सुट्टे पार्ट स्टिलक्लास(अमेरिका) या कंपनीच्या ब्रॅडसाठी सांवत इंडस्टिज् ची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पारदर्शी व विश्वासपुर्ण काम केल्याबद्दल सांवत यांची या आवार्डसाठी निवड करण्यात आली आहे.दरम्यान कोंतेबोबलाद ग्रामपंचातीच्या वतीने सांवत यांचा सत्कार करण्यात आला.
मलेशिया येथे भरगच्च कार्यक्रमात विनोद सांवत यांना ग्लोबल बेस्ट आवार्ड देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान कोंतेबोबलाद ग्रामपंचातीच्या वतीने सांवत यांचा सत्कार करण्यात आला.

