अलकुडएस : अभिनव फाउंडेशन संचलित
मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिर्डी अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय
किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 2 रौप्य व 3 कांस्य पदके मिळवत पुन्हा एखादा आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले.जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यानी 3 सुवर्ण पदके व 6 रौप्य पदके मिळवली होती
त्यातून 9 विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.त्याच विद्यार्थ्यानी राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले.राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याकडून 25 विद्यार्थ्याची निवड झाली होती.त्यामध्ये मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे 9 विद्यार्थ्यानी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते. वजनी गटामध्ये अनुज खंडू कोकरे,संयमी संभाजी कदम यांनी अटीतटीच्या अंतिम फेरी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदका वरती आपली नावे कोरले तसेच अनुष्का विजय चव्हाण,सुरज बंडू कोकरे यांनी तृतीय क्रमांक मिळवत ब्रांज मेडल्स मिळवली
या चारही मुलांची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय (नॅशनल)स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यभरातून बाराशे विद्यार्थीं या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी मुलांची तयारी स्कुलचे बॉक्सिंग प्रशिक्षक अप्पासाहेब तांबे सर व जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व बॉक्सिंग मधील भीष्मांचार्य असे ज्यांना संबोधले जाते असे विजयजी घोलप सर यांनी करून घेतली.तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बॉक्सिंग सारख्या खेळात राज्यस्तरावर,राष्ट्रीय,आंतरराष्ट्री
स्पर्धेत सहभागी संघ





