म्हैशाळच्या पाण्यासाठी आमदारकी पणाला लावू आ. विलासराव जगताप : तालुक्यातील विविध विकासकामाचे उद्धाटन

0

जत,प्रतिनिधी :

Rate Card

 भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यापासून तालुक्यातील विविध विकास कामांना कोट्यवधीचा निधी मिळाला आहे. तालुक्यातील बहुतांशी रस्त्याचे प्रश्न मिटले,  असून म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी आमदारकी पणाला लावणार आहे, असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले. जत तालुक्यातील विविध विकास कामांच्या शुभारंभ आ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जगताप पुढे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात तालुक्यावर अन्याय झाला. तालुक्याच्या वाट्याला आलेला निधी जिल्ह्यातील मंत्र्यांनी पळविल्याने तालुका विकासापासून दूर राहिला. मात्र भाजपचे सरकार आल्यापासून निधी खेचून आणण्यात यश आले. 3 वर्षात कोट्यवधींची विकास कामे झाली आहेत. रस्त्याचे प्रश्न मिटले आहेत. विभाजनाचा मुद्दा प्रतीक्षेत असला तरी संखला अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याने दिलासा मिळाला आहे. येत्या 2 वर्षात म्हैसाळची योजना पूर्ण करण्यासाठी आमदारकी पणाला लावणार आहे. पंतप्रधान सिंचन योजनेतून निधी उपलब्ध झाला आहे. कामाना गती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच काम पूर्ण होईल.आज  विविध विकास कामांचा भूमिपूजन व शुभारंभ आमदार विलासराव जगताप यांच़्या हस्ते करण्यात आले. यात जत दक्षिण व पश्चिम भागातील 26 विकास कामाचा त्यात समावेश आहे. तिप्पेहळ्ळी येथे एसटी पिकअपशेड,शेगाव येथे सभागृह बांधकाम,जत रोड रेल्वे स्टेशन रस्त्याची विशेष दुरूस्थी,शेगाव येथील पिर दर्गा समोर पेग्विन बॉल्क बसविणे पाण्याची टाकी बसविणे,बागलवाडी-मोकशवाडी- आंवढी रस्ता दुरूस्थी,कासलिंगवाडी फाटा येथे पिकअपशेड,वाळेखिंडी -जाधववाडी रस्ता दुरूस्थी,शेगाव -अंनतपूर मार्गावरील कोसारीजवळ दुरूस्थी,धावडवाडीत पेग्विन बॉल्क बसविणे,हिवरे येथे व़्यायाम शाळा बांधकाम,डोर्ली मानेवाडी रस्ता दुरूस्थी,ढालगाव -जिरग्याळ डोर्लीजवळ दुरूस्थी कामाचे उद्धाटन,एंकुडी येथे सभागृह बांधकाम,लक्ष्मी फाटा,सुतार फाटा, केसराळ तलाव,लोहार फाटा,बिळूंर एसटी पिकअपशेड बांधकाम,सिंदूर येथे सभामंडप बांधकाम,उमराणी सिंदू बेरहट्टी मार्गावर सिंदूर नजिक रस्ता मजबुतीकरण, उमराणी येथे सभाममंडप बांधकाम,उमराणी येथे शाळा खोल्याचे बांधकाम,उंटवाडी येथे एसटी पिकअपशेड,उंटवाडी-मेंढीगिरी रस्ता दुरूस्ती,  येळवी -ककमरी ,मल्याळ येथे सभामंडप बांधकाम या कामाचा समावेश आहे.     यावेळी उपसभापती शिवाजी शिंदे,  पंचायत समिती सदस्य रामण्णा जीवन्नावर, लक्ष्मण बोराडे, शिवाप्पा तांवशी, अप्पासाहेब नामद, बसू जबगोंड, अप्पसाहेब पाटील, राजू चौगुले, शहाजी, बोराडे, बसराज पाटील, रवी पाटील, दगडू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जत तालुक्यातील विविध विकासकामाचे उद्धाटन आ. विलासराव जगताप यांच़्या हस्ते झाले. यावेळी उपसभापती शिवाजी शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.