… आणि सभापती आणि सदस्यांनी वाढला मुलांना पोषण आहार

0
8

जत,(प्रतिनिधी):जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी,शाळांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्या जाव्यात,यासाठी पंचायत समितीच्या सभापती मंगल जमदाडे सतत प्रयत्नशील असतात. कार्यालयीन कामातून उसंत मिळाली की, शाळांना भेटी देतात. त्यांच्यासोबत असतात सदस्या श्रीदेवी जावीर.त्याही शिक्षिका असल्याने त्यांना शाळांच्या,मुलांच्या समस्या माहीत आहेत.त्यामुळे दोघीही शिक्षकांना बोल न लावता त्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर देतात.डफळापूर गावातल्या प्राथमिक शाळा आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या.मुलांशी हितगुज साधत समोर बसून त्यांना पोषण  आहारही वाढला.  मुलांशी बोलताना त्यांनी पाठ्यपुस्तके,शालेय गणवेष, मागासवर्गीय मुलांच्याबाबतीतल्या योजना राबवल्या जातात का , याची माहिती घेतली. पोषण आहार आणि मुलांची शैक्षणिक  गुणवत्ता तपासून पाहिली. ज्ञानरचनावाद शिक्षण व त्याचे उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना शिक्षकांना केल्या.वृक्षारोपणवर भर देण्याबरोबरच क्रीडासह अन्य उपक्रमात मुलांचा सहभाग वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांच्या समस्या व अडचणीही जाणून घेतल्या. शिक्षकांना अध्यापनाला वेळ मिळावा,यासाठी  आपल्या पातळीवर प्रयत्न करू,असे आश्वासन दिले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1व 2 ला  भेट दिल्यानंतर  प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तिथल्या कर्मचारी आणि रुग्णांशी भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या. गेल्या सहा महिन्यात सभापती जमदाडे यांनी शाळा भेटींवर भर दिल्याने शाळांच्या कामाकाजात सुधारणा दिसून येत आहे. शाळा स्वच्छता आणि वृक्षारोपण यावरही अधिक भर दिला जात आहे.त्यामुळे पालक, लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.जत तालुक्यातील डफळापूर येथील शाळेत मुलांना पोषण आहार वाटप करताना सभापती मंगल जमदाडे आणि पं.स.सदस्या श्रीदेवी जावीर

दरम्यान सभापती मंगल जमदाडे व सदस्या श्रीदेवी जावीर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट देऊन पाहणी केली

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here