चित्रपट ” हॉस्टेल डेज ,, आठवणींची साठवण

0
7


हॉस्टेल चे आयुष्य हे प्रत्येकासाठी नेहमीच आगळे – वेगळे राहिलेलं आहेतेथील आठवणीना विसरता येणं शक्य नसतेकारण तो काळ खूप वेगळा असतोत्यावेळची मैत्रीस्पर्धाअभ्यासकॉलेजचे वातावरण प्रेम इत्यादी वेगवेगळ्या भावनांनी बांधलेलं असतेह्या सगळ्या कॉलेजच्या छटा अगदीच सगळ्याजरी नसल्या तरी काही अंशी अनुभवलेल्या असतातहॉस्टेल डेज मध्ये असच काही आहेदिगदर्शक अजय किशोर नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने सुभाष बोरा आणि चंदन गेहलोत यांनी श्री पार्श्व प्रोडक्शन आणि २४ स्टुडिओज ने हॉस्टेल डेज ची निर्मिती करून सादर केला आहेकार्यकारी निर्माते स्वप्नील कोरे आणि शार्दूल मोहिते हे आहेतचित्रपटाची कथा – पटकथा अजय किशोर नाईक यांची असून छायाचित्रण – संकलक ची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळलेली आहेसंगीत अजय किशोर नाईक यांचे आहेया मध्ये आरोह वेलणकरप्रार्थना बेहरेसंजय जाधवविद्याधर जोशीविराजस कुलकर्णीअक्षय टांकसाळेअंकिता बोरासाईनाथ गानूवाडसागरिका रुकरीसोनिया पटवर्धनगणेश बिरंगलचिन्मय पटवर्धनयश रुईकर,देवेंद्र गायकवाडपूर्वा देशपांडेअंकिता लांडेपूर्वा शिंदेशुभंकर सातवपंकज खटावकरइत्यादी कलाकारानी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.

सातारा मधील कोरेगाव येथे एक कॉलेज असून ह्या कॉलेजमधील कथा हि नव्व्दच्या दशकातील आहेतेथिल मुलांच्या आणि मुलींच्या हॉस्टेल मधील कथानक असून त्यावेळचे वातावरण दाखवले आहेह्या कॉलेजमध्ये विविध स्तरातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतातती सारी तेथील हॉस्टेल मध्ये राहतातत्यांच्यात मैत्रीप्रेम भावनांचे नाते निर्माण होतेत्यातून अनेकदा रुसवे फुगवे हे सुद्धा होतातह्या कॉलेजला स्थानिक राजकीय नेते बाबासाहेब बुचकुळे यांनी देणगी दिलेली असल्याने ह्या कॉलेजचे नामकरण चंद्राबाई बुचकुले कॉलेज ऑफ टेकनॉलॉजी असे होतेबुचकुले आल्याने नियम बदलले जातात.देणगी देऊन मुलांना प्रवेश दिला जातोदेणगी देऊन आलेल्या मुलाला वेगळी वागणूक दिली जातेवातावरणात फरक पडतोएक प्रकारचा संघर्ष होण्यास सुरवात होते.

ह्याच कॉलेजमध्ये शिवा मोहिते हा विध्यार्थी अकरावी पासून शिकत असतो तो आता एमबीए च्या वर्षाला असतोतो मुलांच्या वसतीगृहाचा जनरल सेक्रेटरी असतोत्याच्या बरोबर ईशानीबुच्चनफुलचंद गावडे उर्फ फुगाअण्णाशेक्सपियरपंढरीलव्हलीनअंतराअसे अनेक मुले शिकत असतातत्याचवेळी भरमसाठ देणगी देऊन जय धर्माधिकारी हा मुलगा हॉस्टेल मध्ये प्रवेश करतोदेणगी दिलेल्या मुलांना सुखसोयी वेगळ्या असतातबुचकुले शिवाला आपल्या बाजूला वळवतातत्यातून संघर्ष निर्माण होतोत्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात,

आपोआप दोन गट पडतातईशानी वर शिवा आणि जय दोघे हि प्रेम करीत असतातसमज – गैरसमज निर्माण होतातशिवा बुचकुले चा माणूस म्हणून त्याच्यावर आरोप होतातत्यातून तो कसा बाहेर पडतो ?ईशानी शेवटी कोणाची होते जय चे पुढे नेमके काय होते अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे हा सिनेमा देतोसर्वच कलाकारांनी भूमिका उत्तम केल्या आहेतहॉस्टेल मधील वातावरणतेथील हेवेदावेइत्यादींवर आधारित हा सिनेमा आहेचित्रपटात तरुणाईला आवडतील अशी गाणी आहेतआता फक्त आजची तरुणाई हॉस्टेल डेज ला कशी साथ देतात हे फक्त बघायचं आहे.



दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here