परिसरातील उत्पादित डांळिबाला जत डाळींब मार्केटमुळे योग्य दर
आ. मोहनराव कदम : जत डांळिब मार्केटचा द्वितीय वर्धापन दिन संपन्न
जत,प्रतिनिधी : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, सलग्न राजे विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवार जतच्या डाळींब मार्केटच्या द्वितीय वर्धापन दिन कॉग्रेसचे जिल्हाध़्यक्ष आ. मोहनराव कदम,सांगली शहरध्यक्ष पृथ्वीराज पाटील,जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत, नगराध़्यक्ष शुंभागी बन्नेनावर यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.
जत,सांगोला,कवटेमहाकांळ,मंगळवेडा,सह सिमावर्ती शेतकऱ्यांच्या डांळिबाला योग्य व जवळचं मार्केट उभे करून बाजार समितीकडून सोय करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात परिसरातील लाखो शेतकऱ्यांच्या डांळिबाला योग्य भाव मिळाला आहे.कोट्यावधीची उलाढाल या मार्केटच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात झाली आहे. यावेळी सभापती अभिजित चव्हाण,आप्पाराया बिराजदार, महादेव पाटील,आकाराम मासाळ,बाबासाहेब कोडक,नाना शिंदे सर्व नगरसेवक,डांळिब व्यापारी,शेतकरी,बाजार समितीचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.वृधापन दिन सोहळ्यानंतर शेतकरी मेळावा संपन्न झाला.
यावेळी बोलताना आ. मोहनराव कदम म्हणाले,परिसरातील डांळिब उत्पादक शेतकऱ्यासाठी बाजार समिती कठिबध्द असेल. डाळींब मार्केटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्च वाचण्यास मदत झाली आहे. शिवाय उत्पादित मालाला योग़्य भाव मिळण़्यास मदत झाली आहे.






