शिक्षण विभागाचा डोलारा फक्त एका क्लार्कवर जत पंचायत समिती; लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे मौन, शिक्षकांत तीव्र नाराजी

0

 

Rate Card

  • जत,(प्रतिनिधी):जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागात फक्त एक क्लार्क आहे. तालुक्यात तब्बल पाचशेच्यावर प्राथमिक शाळा आहेत आणि चौदाशे शिक्षक आहेत.एकाच क्लार्कमुळे पेंडिंग कामाचा ढिगारा आहे. इथे शिक्षकांना धड एक कागद सापडत नाही. शिक्षकांची सेवा पुस्तिका अस्ताव्यस्त पडली आहेत. गेल्या सहा महिन्यापासून एकच क्लार्क काम करतो आहे, त्याने काय काय काम करावे,असा प्रश्न निर्माण झाला असून पंचायत समितीचे पदाधिकारी देखील याबाबत मूग गिळून असल्याने शिक्षकांची मात्र कुतरओड सुरू आहे.
  • जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाबाबत सध्या तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे. गटशिक्षणाधिकारी पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. दोन शिक्षण विस्तार अधिकारी पदे रिक्त आहेत. तीन क्लार्क पैकी फक्त एकच क्लार्क गेल्या दीड-दोन वर्षापासून काम करीत आहे. शिक्षकांची वैद्यकीय बीले,चट्टोपाध्याय बीले, त्यासाठी लागणारी गोपनीय अहवाले,वेळोवेळीच्या रजा, सेवा पुस्तिका अद्यावत करणे, वरिष्ठ श्रेणी संदर्भात कागदपत्रे जमा करणे अशी किती तरी कामे या विभागात आडून पडली आहेत. एक क्लार्क रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी देखील काम करूनही कामाचा निपटारा होत नाही. झिरो पेन्डन्सी उपक्रम राबवण्यात आला,मात्र तरीही थकित कामे तशीच पडली आहेत. अजूनही कामे पेंडिंग पडत आहेत. कित्येक जणांची वैद्यकीय बीले,प्रसुती काळातील वेतन पेंडिंग आहेत. सध्या मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, पदवीधर या पदांच्या पदौन्नती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सध्या शिक्षकांची कागदपत्रे जुळवाजुळव करण्याची धडपड सुरू आहे. शिक्षण विभागात स्टाफ नसल्याने शिक्षकांची कामे वेळेवर होत नाहीत. साहजिकच शिक्षकांना शाळा सोडून हेलपाटे मारावे लागत आहेत.
  • शिक्षकांची सेवा पुस्तके अस्ताव्यस्त पडली आहेत. ही पुस्तके केंद्रानुसार लावली नसल्याने शिक्षकांना त्यांची पुस्तके लवकर सापडत नाहीत. यात विनाकारण वेळ जात आहे. केंद्रानुसार पुस्तके लावून घेण्याची आवश्यकता असताना याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. सेवा पुस्तके अद्ययावत नाहीत.त्यामुळे पुढची कामे होत नाहीत. सेवा निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या शिक्षकांना वेळेत पेन्शन मंजूर होत नाही, हा नेहमीचा अनुभव आहे. याकडे शिक्षक संघटनांचे मौन संतापजनक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. कवठेमहांकाळ सारख्या लहान तालुक्यात पूर्ण पदे भरण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका असलेल्या जत तालुक्यात प्राथमिक शिक्षकांची संख्यादेखील जास्त आहे. शिवाय जिल्हा परिषद शिक्षण सभापती पद जत तालुक्याकडे आहे.तरीही अशी स्थिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.