डफळापूर अपघातातील मयत सागरच्या कुटुंबियाचे शिक्षण सभापती तम्माणगौंडा रवीपाटील यांच्याकडून सांत्वन

0

डफळापूर अपघातातील मयत सागरच्या कुटुंबियाचे शिक्षण सभापती तम्माणगौंडा रवीपाटील यांच्याकडून सांत्वन

Rate Card

जत,प्रतिनिधी: जत- सांगली मार्गावर डफळापूर मधील चव्हाण वस्ती नजीक सागर शिवाजी गडदे ह्या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलाचा सोमवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास जतहुन कवठेमहांकाळ कडे चाललेल्या काळी पिवळी वडाप गाडीची धडक बसल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.पिडित विद्यार्थ्यांच्या कुटूंबियाचे सांत्वन करण्यासाठी सांगली जिल्हा परिषद शिक्षण सभापती तम्माणगौंडा रवीपाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, गटशिक्षणाधिकारी श्री.जगधने साहेब, केंद्रप्रमुख शंकर बेले, शिक्षण संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे, जत पंचायत समिती सधनव्यक्ती सुरेंद्र सरनाईक आदिनीं सागरचे वडील शिवाजी गडदे,आई, भाऊ व बहीण यांचे सांत्वन करत आधार दिला.व शासन स्तरावरून मदतीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.यावेळी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी यांनी राजीव गांधी अपघात विमा प्रस्ताव सादर करावा आशा सूचना शाळेतील शिक्षकांना दिल्या, तसेच शाळेजवळ गतिरोधक बसवण्या बाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.फोटोडफळापूर अपघातातील मयत सागरच्या कुटुंबियाचे शिक्षण सभापती तम्माणगौंडा रवीपाटील,शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, जगधने यांच्याकडून सांत्वन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.