धनगर समाजालाआरक्षण न देणारेच आरक्षित जमीनहडपताहेत– प्रतिक पाटील

0

सांगली :धनगर समाजाला पहिल्‍याच कॅबिनेटमध्‍ये आरक्षण देतो असे म्‍हणणारे आज त्‍या समाजाचीच जागा हडपू पहात आहेत. धनगर समाजाचा विरोध लक्षात घेवून आपण कोळशाचा प्रस्‍तावित थर्मल प्‍लांटची जागा रांजणीतून बदलण्‍याचा निर्णय झाला, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्‍यमंत्री प्रतिक पाटील यांनी व्‍यक्‍त केली. शेळी – मेंढी विकास महामंडळाच्‍या जागेऐवजी बोरगावला जी जागा एमआयडीसी साठी अधिगृहीत करण्‍यात आली आहे, त्‍या ठिकाणी ड्रायपोर्ट होवू शकते, याचाही विचार व्‍हावा असे ते म्‍हणाले.केंद्र सरकारच्‍या प्रस्‍तावितड्रायपोर्टसाठी शेळी – मेंढी विकास महामंडळाची जागा देण्‍यास धनगर समाजाचा विरोध आहे. या जागेवर केंद्रसरकारने शेळी – मेंढी पैदास व संशोधन केंद्रासाठी निधी देवून पुन्‍हा जोमाने सुरु करुन भाजप सरकारने धनगर समाजाला न्‍याय द्यायला हवा. आरक्षण देतो म्‍हणून भाजप सरकारने या समाजाची मोठी फसवणूक केली असून आता हक्‍काची जागादेखील घेवून पुन्‍हा फसवणूक करु नये. वसंतदादांनी शिवाजीबापू शेंडगेंच्‍या मागणीनुसार ही 2200 एकर जागा समाजासाठी दिली आहे. या ठिकाणी लोकर, दुध व मांसासाठी विशेष पैदास केंद्र करावे. अशीही मागणी प्रतिक पाटील यांनी केली. 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.