उमदी,वार्ताहर : लमाणतांडा(माणिकनाळ, ता.जत) येथील फत्तू मेगु लमाण यांच्या मक्याच्या शेतात लागवड केलेला 14 हाजार 750 रूपये किमतीचा गांजा उमदी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला.डीवायएसपी नागनाथ वाकुर्डे,उमदी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. याबाबतचा गुन्हा उमदी पोलिसांत दाखल झाला आहे.
उमदी पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, लमाणतांडा माणिकनाळ येथील फत्तू मेगू लमाण यांच्या मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांज्याची लागवड केली असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान शिंदे , स.पो.नि.प्रविण सपांगे व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने गांजाच्या शेतात छापा टाकून 2 ते 2.5 फूट उंचीची हिरव्या पानांची व ओलसर गांजाची 45 झाडे त्यांचे वजन 2 किलो 50 ग्रॅम त्याची अंदाजे किम्मत 10 हाजार 250 व तयार वाळलेला गांजा 450 ग्रॅम त्यांचे किम्मत 4500 असे एकूण 14 हाजार 750 रुपयांचा गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला आहे.याबाबत उमदी पोलीसात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान शिंदे हे करत आहेत.
चौकट
गत पंधरवड्यात उमदी पोलिसांनी केलेली दुसरी मोठी कारवाई आहे.नूतन पोलीस निरीक्षक भगवानराव शिंदे यांनी मोठी व धाडसी कारवाई केली आहे.उमदी परिसरात पुन्हा एकदा गांजा तस्करी वाढत असल्याचे समोर येत आहे. अशा कारवाई करत राहिल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
फोटो
लमाणतांडा (माणिकनाळ) येथील मक्याच्या शेतात गांजा जप्त करुन कारवाई करण्यात आली. यावेळी डीवायएसपी नागनाथ वाकुर्डे, पो.नि.भगवान शिंदे,रूपनूर,दिघे,
वळसंग,पलूसकर आदी





