मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे चार स्केटींग पट्टूना देश पातळीवरील सुवर्ण पदक

0

अलकूड एस : मी गरूडभरारी घेता..

तु हो आकाश निळे..मी सुर्य कदाचित होता…तु हो किरण कोवळे....

या उक्ती प्रमाणे मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या कोवळ्या किरणांनी राष्ट्रीयस्तरावरील आकाश आपल्या सुवर्ण किरणांनी उजळत 4 गोल्डमेडल(सुवर्ण पदक) मिळवण्याची कामगिरी करत हे सिद्ध केले आहे,की ग्रामीण भागातील विद्यार्थी कमी वयात चांगले व दर्जेदार शिक्षण,मार्गदर्शन मिळाले तर राष्ट्रीय व अांतरराष्ट्रीय स्थरावरसुद्धा आपली छाप पाडू शकतात*

Rate Card

नुकत्याच जीराकपूर (पंजाब)येथे इंडिया वर्ल्ड क्लॅप स्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल चॅम्पियनशीप क्लॅप स्केटिंग स्पर्धा झाली. स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक पटकावत चॅम्पियन ट्रॉफी मिळवली.महाराष्ट्र संघामध्ये कवटेमहांकाळ येथील मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे 4 विद्यार्थीही सहभागी होते.

वरद अरविंद भोसले (रांजणी),अपूर्वा नेताजी माने यांनी (रांजणी),वेदांत संतोष बंडगर (कोकळे),सिद्धी सुनील पाटील (अलकुड एस)

या विद्यार्थीनी सुवर्ण पदक मिळवले.ही अतुलनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याना स्कूलच्या प्रिन्सिपॉल सौ. कविता मेहरा,स्केटिंग शिक्षक अजित पाटील,स्पोर्ट्स टीचर अमर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.मुलांना चांगल्या सोईसुविधा,परिपूर्ण क्रिडा साहित्य,योग्य मार्गदर्शन, देऊन भविष्यात अजून मोठ्या स्तरावरती मुलांची कामगिरी होण्यासाठी अतोनात प्रयत्न करत राहू असे यावेळी यासदर्भांतील माहिती देताना संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मोहन (दादा)माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.