नातवांच्या अपहरणाच्या धसक्याने आजीचा मुत्यू अंकलगीतील घटना : तब्बल दिड दिवसानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या अश्वासनानंतर अत्यसंस्कार

0

माडग्याळ,वार्ताहर : अंकलगी (ता.जत) येथील राघेंवद्र संगप्पा अक्कलकोट या युवकाचे 20 ऑक्टोबंर 2017 ला अपहरण झाले आहे. तेव्हापासून राघेंवद्र सापडलेला नाही. त्याचा राघेंवद्र यांच्या घरच्यांनी धसका घेतला असून त्याची आजी गौरवा शिवमुर्ती आरळी यांचे मंगळवारी राघेंवद्रच्या धसक्याने निधन झाले आहे.मंगळवारी त्यांचा अत्यंविधी करण्यास त्यांचे कुंटुबियी किंवा नातेवाईंक,गावकरी तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अत्यंविधी करावा असे निवेदन ग्रामस्थांनी उमदी पोलिसांना रात्री उशिराने दिले होते. बुधवारी उमदीचे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कुंटूबिय व गावकऱ्यांची समजूत काढली. तर अपहरण बाबत योग्य तपास करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी दुपारी गौरवा यांच्या मृत्तदेहावर अत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान राघेंवद्र यांचे कुंटुबिय व गावकऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले.

Rate Card

निवेदनांत म्हटले आहे की,

अंकलगीतील युवक राघेंवद्र यांचे गावातील संशयित आरोपी तानाजी चिंदानंद कोळी यांने अपहरण केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे शिवाय कोळी यांला अटक करण्यात आली.तरीही राघेंवद्रचा तपास लागलेला नाही. राघेंवद्रच्या तपासासाठी कुंटूबिय,व गावकऱ्यांनी उपोषण, पोलिस ठाण्यावर मोर्चा काढूनही काहीही निष्पन झाले नाही. त्यामुळे राघेंवद्रचे कुंटुबिय प्रंचड मानसिक दबावाखाली आहे. त्याच धक्क्याने राघेंवद्रच्या आजी गौरवा आरळी यांचे मंगळवारी निधन झाले आहे.त्यांचा अत्यंविधी करायचा नाही असा पवित्रा ग्रामस्थानी घेतला होता.पोलिसांनी अत्यंविधी करावा अन्यथा मृत्तदेह उमदी पोलिस ठाण्यासमोर ठेवू असे निवेदन ग्रामस्थांनी उमदी पोलिसांना दिले होते. त्यामुळे मंगळवार रात्री पासून बुधवारी दुपारपर्यत मृत्तदेह तसाच ठेवण़्याच आला होता. अंकलगीतील ग्रामस्थ तणावाखाली होते. पोलिसही रात्री उशिराने अंकलगीत पोहचले तरीही कुटुंबीय व गावकरी अत्यंविधी न करण्याच्या मनस्थितीत होते. बुधवारी उमदीचे सा. पोलिस निरिक्षक व काही अधिकाऱ्यांनी गावकरी कुंटुबियाची समजूत काढत,कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी दुपारी गौरवा आरळी यांच्या अंकलगी येथेच अत्यसंस्कार करण्यात आले.गावकऱ्यांनी निवेदन प्रसिध्दीसाठी संकेत टाइम्स कडे पाठविले आहे. राघेंवद्र अक्कलकोटचा गतीने तपास करावा अन्यथा कुंटुबियातील अन्य काही सदस्य धक्क्याने मुत्यू पावण्याची शक्यता आहे. असे निवेदनात म्हटले आहे.दरम्यान

तपासाबाबत सपोनि शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी आरोपी तपासास प्रतिसाद देत नसल्याने व दुसऱ्या आरोपीच्या राहत्या ठिकाणी चौकशी केली असली तरी काही निष्पन्न न झाल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या तानाजी कोळी या आरोपीचे नार्को टेस्ट साठी न्यायालयाकडे मागणी केली आहे असे सांगितले.

अंकलगीतील गौरवा आरळी यांच्या बुधवारी दुपारी पोलिसाच्या उपस्थितीत अत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.