उमदी, वार्ताहर :
जाडरबोबलाद ता. जत येथे शनिवारी रात्री 12 च्या सुमारास जुगार अड्डयावर छापा टाकण्यात आला.
उमदी पोलिस ठाण्याचे सपोनि भगवान शिंदे यांच्या पथकाने कारवाई करत 33हाजार चारशे रूपयांचा, मुद्देमालासह पाच जणाना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली जिल्ह्याचा अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्या पासून सर्वच पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना अवैध धंदे चालणार नाहीत असा सज्जड इशारा दिला आहे. त्यातच उमदी पोलीस ठाण्यास नविन अधिकारी आल्याने पुन्हा दंबगगिरी चालू झाली आहे.नवीन सपोनि भगवान शिंदे आल्यापासून अवैध धंदेवाल्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून उमदी पोलीस ठाणे हद्दीतील सर्वच अवैध धंदे सध्यातरी बंद करण्याच्या मागे उमदी पोलिस लागले आहेत.
जाडरबोबलाद येथे फार वर्षापासून जुगार अड्डा चालू होता. सदर अड्डा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या आशिर्वादाने चालत असल्याची देखील चर्चा होती. या जुगार अड्ड्यावर एखादा पोलिस कर्मचारी अथवा अधिकारी जावून कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर राजकीय दबाव टाकला जायचा, परंतू कोणत्याही दबावाला न जुमानता उमदी पोलिसांनी काल शनिवारी रात्री येथील जुगार अड्डयावर छापा टाकला. यात अड्डा चालक तम्माराय गिऱ्याप्पा काटे वय-32 व सिद्राम लायाप्पा काटे वय-28, रामा कुंडलिक ऐवळे वय- 40, अब्दुल दिलावर राजोरी वय- 28, सिद्राम रवि वय -35 यांना ताब्यात घेत कारवाई केली. यात पाच आरोपीकडील एक मोटार सायकल, तीन मोबाईल फोन व रोख रक्कम 3400 असे 33400 रु मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण सपांगे, ए. एस. आय. कोळी, नितिन पलुसकर यांनी सहभागी घेत कारवाई केली.





